Skip to main content

कथा

कावळा

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 14/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी कुठे तरी वाचलेली कथा- आटपाट नगरात एक गरीब कष्टकरी कुटुंब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे. एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो.

सोलमेट

लेखक गिरिजा यांनी मंगळवार, 10/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत.. आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५ वर्ष! सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे..

सलाम राम राम

लेखक मीचजणु यांनी मंगळवार, 03/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मनोहरची बाईक मध्य रस्त्यात बंद पडली. रात्रीचा अंधार आता चांगलाच जणवत होता. थंड हवेची लाट अंगावर काटे आणत होती, व तेवढ्यात भिती होती तेच झाले. थेंब थेंब टीपके चेह-यावर जाणवले आणि हा हा म्हणता धो धो पाऊस सुरु झाला. मनोहरने लगबग बाईक झा़डाखाली लावली. रस्त्यावर कुणीच नव्हते, एवढ्या रात्री या अरण्यातील रस्त्यात कोण असणार. एका मोटारीचा प्रकाश दुरुन येताना दिसला, मनोहरने पुढे येऊन हात दाखवला, पण मोटार सर् पाणी उडवत गेली. मनोहर ओला चिंब भिजला. "अरे मनोहर असा पावसात का भिजतोयस?", त्याला ऐकू आले. मागे रिक्षा मधून आदिती बोलावत होती. असे अचानक तीला पाहुन तो क्षणभर गोंधळला.

सत्यशोध(एक छोटिशी गोष्ट)

लेखक मन यांनी शुक्रवार, 30/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल. तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्‍या चेहर्‍यावर त्यानं पाणी मारलं. आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं हातात सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत, आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं , निरागसता होती ती निसर्गात उमललेली. आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला. त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या.