मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

बार-ऍट-लॉ

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती. सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही. "अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीतराहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली." मी त्याना म्हाणालो, "तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?" "तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी

आवाज कुणाचा ?

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो. अगदी आयुष्याच्या 'अथ' पासून 'इती' कान कसले कसले कष्ट सहन करत असतात बिचारे. आता नेहेमीचच उदाहरण घ्या. तूम्ही कधी कधी (कधी कधी नव्हे नेहेमीच) लोकल गाडीची वाट बघत उभी असता. लोकांचा कलकलाट सूरु असतो. मध्येच ध्वनीक्षेपकावर कसली तरी 'खूडबूड' ऐकायला येते. " एक विशेष सूचना". तूम्ही पंचप्राण एकत्र करून 'ती' ऐकण्याचा प्रयत्न करता. " खर्र... खर्र... खूर्र... खूर्र... खड.. खड.. खडाक खूडूक गाडी खट खट उशीराने ...........

मुलीला आपली आई माहित हवी.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते. असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं, " असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?" त्यावर ती म्हणाली, "आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.?

जॉली

निखिलचं शाईपेन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो ... कथा प्रकाशित करायला .. मिपावर काही तांत्रिक ..अडचण आहे.... तरी सध्या इथे वाचा आणि कळवा ... नंतर पोस्ट करतोच आहे.. इथे.... http://purwant.blogspot.com/2008/10/blog-post.html निखिल

माझी गोष्ट

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली. अस हल्ली सारख घडतय. माझ मन थार्‍यावर नाही. कसली तरी टोचणी लागून राहीलीये मनाला. आता राहील मी कोण्?.सांगतो. माझ नाव राकेश. देसाई वकिलांकडे मी असिस्टंट म्हणून सुरूवात केली. ते त्यांच्या निव्रुत्ती नंतर ही अजून तिथेच आहे. आज काल त्यांचा मुलगा वकिली बघतो. कधी तरी माझा सल्ला विचारतो. आता माझी चाळीशी आलीये. म्हणजे काही फार वय नाही. Life begins at 40 म्हणतात ते काय उगाच?

अजाणता !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वैतागुन समिधाने हातातली डिझाईन्सची वही बेडवर टाकली. पुन्हा पुन्हा मन लाउन काढलेल्या तिच्या डिझाईन्स आत्ता तिला फ़ारच टाकावू वाटत होत्या, उद्याच तिला एका लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर होती आणि तिच्याकडे अजुनही ज्या साठी ती ईतकी प्रसिध्द होती तश्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स नव्हत्या. तिच्या अप्रतिम डिझाईन्समुळेच तर ती नावा रुपाला आली होती, मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर तिला मिळत होत्या. पैसा ही महत्वाची बाब होतीच पण आता तिला प्रसिध्दीही मिळत होती.

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

प्रभाकर पेठकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३

प्रभाकर पेठकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३ "'इज इट रिअली नेसेसरी डॉक्टर?" "हो! आपण कोलोनोस्कोपी करून घेऊया." "ते काय असतं?" मी अंदाज येऊन घाबरून म्हणालो. "काही नाही! एंडोस्कोपी केली तसेच आतडेही चेक करून घ्यायचे. म्हणजे कसं एकदा सर्व चेक झाले की शंका उरणार नाही. उगीच नंतर पस्तावायला नको.

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२

प्रभाकर पेठकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३ ते झाल्या झाल्या ती मला म्हणाली, "पँट काढा, कॅथेटर बसवायचे आहे." मी त्याला मात्र कठोर आक्षेप घेतला. "म्हंटले कशा करता. मी शुद्धीत आहे. माझे सर्व व्यवहार व्यवस्थित करू शकतोय." डॉक्टर, "नो सर, बट वुई हॅव टू मॉनिटर युरीन. वुई हॅव टू मेझर इट." मी, "नो, बट आय ऍम क्वाईट ओके अँड हॅवींग नो कंप्लेंटस अबाउट युरीन." डॉक्टर, "आय नो!

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

प्रभाकर पेठकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.