मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

"हलो"ह्या शब्दातली क्षमता.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले. नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं. नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं, "हा माझा मित्र ,सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केलीअसून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं."हलो" ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाही तरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणा

काटेकोरांटीची फुलं.

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी.

सेवाभावी (भाग १)

भास्कर केन्डे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या.

दुःखाची देवाण -घेवाण.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला. गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.

आम्ही पेट्स ठेवतो !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!! साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास आढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ.

भूमीका

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला. "अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल. गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली. "चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे" गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.

शल्या !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर शल्या हे संपुर्ण काल्पनिक पात्र नाही, पण पुर्णार्थाने खरेही नाही त्यातुन ह्या कथेत बाकी बर्‍याच जणांनी हजेरी लावलीये ( माझ्या सकट ) त्यामुळे................. !

भिती !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ट्रिंग ट्रींग फ़ोनने आपण जिवंत असल्याची घोषणा केली आणि वैतागत हातातले मासिक टाकत निशांतने फ़ोनला हात घातला. " कोण"? त्याच्या आवाजातला वैताग जाणवत होता. " मी स्वप्ना बोलतेय". पलिकडून उत्तर आले. " कोण स्वप्ना" " अरे स्वप्ना, स्वप्नाली तुझी मैत्रिण"! " अरे स्वप्ना तु? इतक्या दिवसांनी नाही वर्षांनी फ़ोन करतेयस? कुठे होतीस इतके दिवस विसरलीस की काय मला?" अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारतोस, तुला माहिताय ना माझ्या पपांच्या बदलीनंतर आम्ही सगळेजण बंगलोरला गेलो". " ते माहीताय गं मला पण त्या नंतर तु माझ्याशी संपर्कच ठेवला नाहीस ईतक्या दिवसांची दोस्ती एकदम कचरापेटीत टाकलीस" "चिडतो काय रे?

लक्ष्मी-नारायण

निमीत्त मात्र ·
लेखनविषय:
स्वर्गामधल्या "बाल-कवी' मार्गावरील "मुक्तांगण' प्रासादातील "फुलराणी' दालनात पु. ल. देशपांडे बसले होते. त्यांच्यासमोर वाजवायची पेटी होती. शेजारी तबलजी बनून वसंतराव देशपांडे बसले होते. पु. ल. तल्लीन होऊन गात होते.. "उगीच का कांताऽऽ' आणि पेटीवरून विविध प्रकारची स्वरांची नक्षी काढत आपल्याच गाण्याला साथ करीत होते... एक कडवे झाले की तबला वाजवता वाजवता वसंतराव पुढचे दुसरे कडवे गात होते. दोन देशपांड्यांची मैफल आता अगदी ऐन रंगात आली होती. .. दारात कुणाची तरी पावले वाजली. "कोण आहे?' पु. ल. "मी आहे.' ती "पण "मी' कोण? नाव, गाव, काही आहे की नाही?' "नाही ना!' "असं कसं होईल?

गुरुपूजन!

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला. हॉलमध्ये टाळ्या वाजतच होत्या, आणि स्टेजवर राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून तो बराच वेळ तसाच बसला होता... महाराजला हेच दृश्‍य अपेक्षित होतं. काही वेळानं टाळ्या थांबल्या. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केवळ शांतता पसरली होती. ...