सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.
"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?''
मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना!
"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही.