मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

व्यायाम हराम आहे!

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला. "लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?'' मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना! "बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही.

अब पछतावेसे क्या फायदा ( उत्तरार्ध)

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.>> पहिला भाग इथे वाचा
मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब.

अब पछतावेसे क्या फायदा ( पूर्वार्ध)

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो. आता पुलिसला सांगतोय मला मरु दया.माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले.

आईची विटंबना

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली, पण मिपावरचा तो तिरंगा पाहून ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला.

जीवन त्याना कळले हो

कवटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेलापूरला पामबीच रस्ता जिथे संपतो तिथेच एका व्यवसायीक इमारतीत आमचे कार्यालय आहे. त्या इमारतीत वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आणि तळमजल्यावर एका गाळ्यात बसूचे हॉटेल आहे. बसूचे हॉटेल हे हॉटेल कम खानावळ कम पानटपरी कम कोल्डड्रिंक हाऊस आहे. रोज सकाळी ऑफिसला आलो की गाडी लाउन खाली बसूच्या हॉटेलात वडापाव किंवा भजीपाव खाउन चहा सिगरेट मारून मग वरती ऑफिसात येणे हा आमचा नित्याचा क्रम. सकाळी सकाळी बसूची गडबड पहाण्यासारखी असायची.

विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे

कवटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्याच अस झाल की परवा मी माझ्या पुतण्याला प्ले स्कूल मधे सोडायला गेलो होतो. खरे म्हण्जे त्याला एक छानसे पत्र लिहावे अशीच माझी इछ्छा होती. पण तो घरात राहुनच रोज २ तास शाळेत जाणार होता. त्यामुळे उगाच पोष्टाचा खर्च कशाला वाढवा असा सुज्ञ विचार मी केला. शिवाय 'शाळेत जाणार नाही ' असे त्याने जोर्दार भोकाड पसरले होते. त्यात त्याला पत्र वाचायला देणे मला तरी योग्य वाटले नाही. एक तर माझे अक्षर कुणाला लागत नाही. (माझे पेपर तपासणार्‍यांना ते कसे लागले आणि त्यानी मला कसे पास केले हा एक संशोधनाचा विषय आहे.

मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन) आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर दोन शतके लेखनाची लिहूनी मिपावर येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी वाचक हो, तुमच्यासाठी लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी वाचक हो, तुमच्यासाठी आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी वाचक हो, तुमच्यासाठी उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी वाचक हो, तुमच्यासाठी

निरभ्र

श्रावण मोडक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
झाकोळल्या सावल्यांनी हुंकार असा का द्यावा डोळ्यांतला तुझा तो मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात... दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी... 'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.