Skip to main content

निशब्द - अंतिम भाग.

लेखक सँडी यांनी गुरुवार, 28/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुढे... ती: मी बाबांशी बोलु का? तो: नको. मी बोलेल योग्यवेळी. ती: ठीक. तो: आपल्या मित्रमैत्रीणींसाठी आपलं नातं वेगळचं आहे नाही? ती: हो! पण आजकाल सगळे संशयित नजरेने पहातात. तो: हं! चल तुला सोडतो बसस्टॉपला. ती: .... ----------------------------------------------------------------- (संध्याकाळी फोनवर) ती: हॅलो! काय करतोयसं? तो: काही नाही. बसलोय. ती: बाहेर नाही गेलास आज? तो: नाही. ती: माझ्या फोनची वाट पहात होतास ना? तो: .... ती: तु कधी तुझं मन मोकळं करणार आहेस का? तो: काय बोलंणार? ती: जे मनात असेल ते! तो: .... ती: तु कितीही लपवलस तरी तुझे डोळे सगळं बोलत असतात. तो: .... ती: आता बोल ना काहितरी. तो: मी स्वप्नांच्या जगात नाही जगत. ती: मलाही नाही जगायचं त्या विश्वात. तो: काल तुला सोडल्यानंतर संयोग भेटला होता. ती: ....मग? तो: काही नाही. तुझ्याबद्दल विचारत होता. ती: काय? तो: असेच. ती: काय विचारत होता तो? तो: आपल्या दोघांमधे काही आहे का विचारलं. ती: मग? तो: मी सांगितले असे काहीही नाही. ती: ह्म्म! तो: तु काय ठरविले आहेस त्याच्याबद्दल? ती: काsssय! तो: तु काय ठरविले आहेस त्याच्याबद्दल? ती: म्हणजे? तो: तुला प्रपोज केलयं ना त्याने? ती: .... तो: हॅलो! ती: .......................हो. तो: मग? ती: .... तो: तुला आवडत असेल तो तर... ती: .... तो: तु मला हे सांगायला हवं होतं. ती: मी सांगणारच होते. तो: कधी? ती: मला वाटले तु रागावशील. तो: तु सांगितले असते तर ठीक होतं. ती: सॉरी! तो: .......मग काय ठरविले आहेस? ती: काही नाही. तो: त्याला उत्तर दिले? ती: नाही अजुन. तो: तु त्याला उत्तर द्यायला हवे होते. ती: काय उत्तर देऊ? तो: हं! मी कसे सांगणार? ती: .... तो: चल. फोन ठेवतो. जेवुन घे. उद्या भेटु ऑफिसमध्ये! जमले तर लवकर ये जरा. ती: ओके. ----------------------------------------------------------------- (सकाळी ऑफिसमध्ये) ती: बाहेर येतोस का जरा? तो: येतो. तु जा पुढे. ----------------------------------------------------------------- ती: काय झाले? तो: कुठे काय? ती: मघाशी ऑफिसमध्ये येताना मला पाहुन रस्ता का बदललास? तो: तुला पाहुन? ती: बरंsss! आम्हा दोघांना. मला बसस्टॉपवर भेटला संयोग. तो: .... ती: तुला राग आला का? तो: कशामुळे? ती: मी त्याच्याबरोबर आले म्हणुन? तो: नाही! असे काही नाही. ती: हम्म! तो: बोलणे झाले का त्याच्याशी? ती: नाही. तो: .... ती: तु का त्याचा विचार करतोस? तो: हं! तु करतेयसं ना? मग मी का करु? ती: .... तो: .... ती: मी आज लवकर जाणार आहे संध्याकाळी. बाबा पण येताहेत. तो: अरे वा! काय विशेष? ती: काही नाही. नेहमीप्रमाणे पाहुणे पहायला येणार आहेत. तो: ......मी येईल तुला घरी सोडवायला. ती: ...............आज रुपेश येणार आहे इकडे. मला घरी सोडवेल तो. तो: .... ती: आता रागावु नको रे! तो: लग्न केले का रुपेशसाहेबांनी? ती: नाही अजुन वाट पहातोय माझ्या होकाराची. समाप्त.
लेखनविषय:

वाचने 1435
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया