Skip to main content

कथा

"कुलूप किल्ली" ....

लेखक kvponkshe यांनी बुधवार, 25/08/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाद रात्री धावतच माझ्या कडे आला. "ती आता बोलते आहे, "आई आलीये, मला बोलावते आहे" असं म्हणत हसते आहे." असं तो धापा टाकत सांगत होता. मी थोडा हादरलोच. माझ्या डोळ्यासमोर जवळपास ३७ वर्षांपूर्वीचा प्रसंग आला..... यातील, ती म्हणजे सुलेखा, जन्माला आली तेव्हा तरी नॉर्मलच वाटत होती . ती पुढे "अशी" होईल अशी कोणालाच कल्पना आली नाही. अशी म्हणजे मतिमंद, किंवा हल्लीच्या सोफिस्टिकेटेड भाषेत विशेष मूल! वनमालाबाई आणि गोपाळराव (यांचे आडनाव मी मुद्दाम सांगणार नाहीये) याना लग्नानंतर झालेली पहिलीच मुलगी ! वनमालाबाई, गोपाळराव आणि सुलेखा !

विदेशी कथा परिचय (१०) : समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 24/08/2021 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ : https://www.misalpav.com/node/49146 …………….. २ जून २०२१ पासून सुरू केलेली लेखमाला आता संपवत आहे. साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी (लघु)कथा हा एक महत्त्वाचा आणि वाचकांना रिझवणारा प्रकार. जागतिक कथासागर अफाट आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील काही निवडक विदेशी कथांचा आस्वाद घेता आला. या लेखमालेची सुरुवात अगदी ठरवून अशी काही झाली नाही. ती कशी झाली ते सांगतो. गेले तीन-चार वर्षे दरसाल पावसाळ्याचे सुरवातीस एखादे चक्रीवादळ येत असते. त्यावेळेस जोरदार पाऊस पडतो.

डिस्टोपिया

लेखक भागो यांनी शनिवार, 21/08/2021 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे “ सी/२०१९क्यू४ ” धुमकेतू वर जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती.

दैवाचा रिव्हर्स पंगा(इतरत्र पूर्व प्रकाशित)

लेखक भागो यांनी बुधवार, 18/08/2021 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
दैवाचा रिव्हर्स पंगा विक्रम भालेराव हे “पॉवरकॉन” कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होते. मी अस ऐकले आहे की सॉफ्टवेअर कंपन्यांमधून मॅनेजरला मांजर म्हणतात. पण भालेराव मांजर नसून वाघ होते. ते कायम कुणावरतरी हल्ला करून त्याला फाडून खायच्या मूड मध्ये असत. हे असे का? त्याला अनेक कारणे असावीत. तुम्ही खोदून चौकशी केलीत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे एकमुखाने सांगतील, “सरांचे काय आहे तसे ते स्वभावाने फार चांगले आहेत. ते कुणावर आरडा ओरड करतील त्याचा नेम नाही, पण ते मनात काही ठेवत नाहीत. ऑफिसमधून संध्याकाळी घरी जाताना मन कसे निर्झरासारखे स्वच्छ!

मिस्ड कॉल

लेखक भागो यांनी रविवार, 15/08/2021 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्ड कॉल विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते. “ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला. “गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला. “मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला. “अल्फा पाव्हणं, हे आहे पाळदे बुद्रुक! तुम्हाला दुसरा बाजीराव माहिती आहे का? नाही माहीत? सोडून द्या. तुम्ही असं करा समोर मळयात विहिरीवर मोट चालू आहे. तिथे पाणी प्या.

गाणी - मनातली

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 10/08/2021 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जीवनातल्या प्रत्येक घडीसाठी, प्रसंगासाठी, घटनेसाठी गाणी पुरवलेली आहेत. तुम्ही कोणताही प्रसंग डोळ्यासमोर आणा, त्याला साजेसं गाणं तुम्हाला नक्कीच सापडेल. प्रियकराला स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हिंदी गाणी जितक्या आस्थेने मदत करतात तितक्याच आस्थेने प्रेमभंग झालेल्या हृदयाला पिळवटून टाकणारी गाणी तत्परतेने पुढे येतात.

मैत्रीणे भरली पोकळी!

लेखक Bhakti यांनी रविवार, 01/08/2021 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते.

माझं बेबी सीटिंग ........

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 26/07/2021 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं की आमच्या सुनबाईंनी आम्हा दोघांना बेबी सीटिंगसाठी बोलावले. आमचा नातू, नायल चार महिन्याचा झाला होता व चेहरे, आवाज बऱ्यापैकी ओळखू शकत होता. तसेच बाटलीने दूध देखील प्यायला शिकला होता त्यामुळे आठ तासांसाठी त्याला सांभाळणे फारसे अवघड जाणार नव्हते. आणि तसेही आम्ही आमच्या मुलाला वाढवले होतेच त्यामुळे बेबी सीटिंगचा फर्स्टहँड अनुभव देखील गाठीशी होता. तरी देखील नातवाला तो जागा असताना कशा न कशात गुंतवून ठेवणे गरजेचे होते नाहीतर रडारड व्हायची शक्यताच जास्त होती.

ती सुंदर? मीही सुंदर ! ( कथा परिचय: ६)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 26/07/2021 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ............................ आतापर्यंत वाचकांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे या लेखमालेचे पाच भाग प्रकाशित झालेत. सहावा भाग सादर करताना आनंद होत आहे. या भागासाठी Katherine Mansfield यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी जन्माने न्यूझीलंडच्या.

सिलींडर ५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/07/2021 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ५ आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो.