Skip to main content

कथा

ध्रांगध्रा - ५

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/01/2022 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार होत चाललाय. त्याही अवस्थेत मी वर पहातो. सुर्याला एका काळ्या मातकट ढगाने झाकून टाकलंय. उजेड संपत चाललाय. जाणवण्यासारख्या दोनच गोष्टी. माझ्या मनगटावरची घट्ट होत जाणारी महेशची "पकड" आणि अंधार...... मागील दुवा ध्रांगध्रा - ४ http://misalpav.com/node/49734 आ......ह. कुणीतरी टाळूवर थेट हातोडीने हाणलं असावं असं दुखतय डोकं. मी डोक्याला मागे हात लावतो. बोटाला काहितरी ओलसर चिकट लागतं. अरे बापरे. हे काय....... रक्त! माझे डोके दगडावर आपटलं. मागच्या बाजूला खोक पडली आहे. आजूबाजूला अंधारच दिसतोय. माझ्या बाजूला कसलंसं मुटकुळं पडलंय.......

ध्रांगध्रा - ४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/01/2022 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी का क्या पता .. राहे किस ओर मुडेंगी. हाल हो ... बेहाल हो ....चलना अपना काम है... मागील दुवा ध्रांगध्रा-३ http://misalpav.com/node/49727 गाणे गुणगुणायला सुरवात कोणी केली ते सांगता येणं कठीण आहे. पण आम्ही दोघेही तेच गाणं गुणगुणतोय. इतका वेळ ती चढणीची वाटणारी वाट आता तितकीशी चढणीची वाटत नाहिय्ये.डोंगरात चालताना ती गोष्टीत असते तशी दाट झाडी तशीही नव्हतीच तुरळक एखादे झाड दिसायचे तेही आता नव्हते. पायाखाली येऊन घसरायला होणारे गवत आता जवळजवळ नाहिसे झालंय. पायवात निसरडी नाही पण मुरुमाड धुळीची झालीये..

ध्रांगध्रा-३

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 02/01/2022 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
" ते झाड मागे टाकून अर्धा तास झाला पुढे आलो आपण तु म्हणतोस तसा रस्ता कुठे दिसलाय? आपण पुढे तर नाही ना आलो? नाही रे . झाड मागे गेलं हे खरं, पण तुला वाटतं तसं ते वळण झाड गेल्यावर लगेच येणार नव्हतं तर थोड्या वेळाने नंतर म्हणजे थोडे आणखी चालल्यावर. आम्ही इतकं बोलतोय तोच समोरून कोणीतरी येताना दिसतय. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी,हातात पिशवी. "कोण असेल रे?" हळू हळू तो माणूस आमच्या जवळ येतोय.
मागील दुवा ध्रांगध्रा-२ http://misalpav.com/node/49721 "रामराम दादा " तो जवळ आला तशी महेशने त्याला हाक मारली.

ध्रांगध्रा - २

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 01/01/2022 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
पण काय करणार. दोस्त पडला ना. कुणीतरी म्हंटलय की शाळेत स्वतःला लागली नसतानाही मित्राला सोबत म्हणून मुतारीपर्यंत येतो तो तुमचा खरा दोस्त. लोक ना कायच्या काय संबंध जोडतात...... मागील दुवा ध्रांगध्रा - १ http://misalpav.com/node/49708 पण ही व्याख्या एकदम पटते मनाला. त्याने सांगताना सांगितलय "वणी" ... पण ते ठिकाण त्याही पुढे म्हणजे थेट "धोडप" च्या पायथ्याला आणलंय.

खंडेरायानं करणी केली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/12/2021 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
यळकोट यळकोट जय मल्हार बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ व्हती मेंढरं खंडीभर चराया नेली डोंगरावर हिरवा पाला रानोमाळं भवती गार गार वारं आलं भरूनी आभाळं काळ्या ढगांच झालं भार पळात आलं धरणीवर चकमक दावली विजेनं कल्लोळ उठला त्या ठाणं चमत्कार दावला देवानं वर रोखूनी धरलं त्यानं बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥ एका दिशीची कहाणी तहान लागली मेंढरास्नी नेली देवानं गिरणेवरी प्यायला लागली पाणी नदीला आला पूर भरपूर जिकडे तिकडे हाहाकार केला छातीचा बंधार पाणी अडवती मल्हार बाणाईच्या मेंढरासा

ध्रांगध्रा - १

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ध्रांगध्रा - १ "आता हे झाड दिसतय ना त्याच्या बाजूने पुढे गेलो की दिसेलच आपल्याला." "आरे असं सांगून दाखवलेलं हे पाचवं झाड." "नाही रे, या वेळेला अगदी खरं. माझे गट फिलींग सांगतंय मला. यावेळेला अगदी खरं दिसेल ते आपल्याला. मला तर मनातून आत्ता ते दिसायलाही लागलंय." "काय?" "काय म्हणजे? आपण जे शोधतोय ते. ते मोठे देऊळ. त्याच्या त्या दगडी भक्कम भिंती... त्याचा भव्य दिंडी दरवाजा..... देवळाशेजारी उभे असलेलं पिंपळाचं झाड, झाडाखाली प्रशस्त पार. सगळं दिसतंय बघ मला अगदी मनात." "बघ बघ नीट बघ. पारावर माणसे पण बसली असतील तिथे.

प्रेम आणि द्वेष

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/12/2021 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि द्वेष . उद्यानातील कोपऱ्यात असलेल्या त्या निष्पर्ण ,निर्जीव आणि निरुपयोगी झाडाकडे आता कोणीही बघत नव्हते. ते उद्यान सुद्धा आता कुलूप लावून बंद केले होते. काही दिवसापासून अगदी अघोरी वाटाव्यात अश्या घटना त्या झाडा भोवती होत होत्या. काही दिवसापूर्वी एकाएकी ते सुंदर झाड वाळायला लागले. सगळी पाने गळून गेली. सगळी फळे सुकून गेली . आणि एक उग्र वास त्या झाडाच्या अवती भोवती पसरला. आपल्या जवळ कुणीही येऊ नये अशी त्या झाडाची योजना असेल का ? कुणास ठाऊक पण अगदी ..परवा परवा पर्यंत कसे छान बहरलेले होते ते झाड !... कसली तरी छोटीशी लाल चुटूक फळे लागायची त्याला.

गाव

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 20/12/2021 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

२२ यार्ड

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 11/12/2021 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल. फळी (बॅट) विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा. एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म