Skip to main content

कथा

पक्कीची पहिलीवहिली गोष्ट

लेखक भागो यांनी गुरुवार, 23/09/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे पक्कीची. आधी तुम्हाला पक्की कोण त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पण पक्कीला वेडा ठरवून त्याच्या गोष्टी वाचणार नाहीत. पक्कीची पक्की ओळख झाली की मग तुम्ही त्याचे फॅन व्हाल! पक्की ऊर्फ पक्या ऊर्फ प्रकाश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वय किती? तो कितीवीत शिकत आहे? कुठल्या शाळेंत जातो? मला नका विचारू कारण त्याची उत्तरे मला माहीत नाहीत. कधी कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे. कधी कधी त्याच्या निरागस वागण्याने तुम्हाला वाटेल की तो पाच सहा वर्षांचा असावा. तुम्हीच ठरवा.

लघुकथा

लेखक मालविका यांनी शनिवार, 18/09/2021 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
लघुकथा 1 महापुरात घर आणि दुकान दोन्ही उध्वस्त झालेल्या त्याचा जीव गणेश चतुर्थी जवळ आल्यावर तळमळू लागला. कर्ज काढून कसाबसा व्यवसाय नि घराची गाडी मार्गावर आणत होता तो. त्यात या लॉक डाऊन ने सगळं महाग करून ठेवलेलं. गणपतीच्या मूर्तीच्या किमतीत दोन दिवसांचा आपला घरखर्च भागेल असा विचार करून नाखुषीनेच त्याने सण साजरा न करायचे ठरवले. चतुर्थी च्या आदल्या दिवशी तर त्याची घालमेल होऊ लागली पण परिस्थितीने तो गप्प बसला. संध्याकाळ झाली आणि मूर्तीशाळेचे मालक अचानक त्याची ठरलेली मूर्ती घेऊन दारात हजर झाले. तो अवाक झाला. मालकच म्हणाले," अरे,अशी संकटं आली म्हणून हरून जायचं नसतं. अरे हा विघ्नहर्ता आहे.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/09/2021 06:19 या दिवशी प्रकाशित केले.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

करिअर प्लॅॅनिंग

लेखक भागो यांनी बुधवार, 15/09/2021 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या. “या, कुमारने मला सांगितले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.” “सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो. “नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे?

देवाक काळजी

लेखक भागो यांनी शुक्रवार, 10/09/2021 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव! माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले. ह्या वयातदेखील बाबा दवाखान्याची पायरी चढले नव्हते. जुने खोड! पण अलीकडे मी बघत होतो, बाबांना थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला होता.

तीन इच्छा

लेखक भागो यांनी सोमवार, 06/09/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

सुटका

लेखक भागो यांनी शुक्रवार, 03/09/2021 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती. डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेआठ झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हा चिटपाखरू नव्हे पण मधुनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरु होऊन दोन तीन आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच कायती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती, कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर?

जनरेशन गॅॅप

लेखक भागो यांनी गुरुवार, 02/09/2021 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग स्वतःवरच भनकला होता. शेजारचा श्रीरंग तो किती हुशार होता. ते काय म्हणतात न हां स्मार्ट! सगळेजण त्याची स्तुति करतात. पोरीबाळींशी बोलताना तर विचारायला नको. असा लाळघोटेपणा करतो. पण कामात मात्र चुकार. साधी बेरीज वजाबाकी करण्यात हजार चुका. वाण्याकडे सामान आणायला गेला तर वाणी त्याला हमेशा चुकीची मोड देणार! त्याचा मालक दहादा त्याच्याकडून हिशेब करून घेणार, मालक बिचारा म्हातारा झालेला, पहिल्या तारखेला येणाऱ्या पेन्शनवर सगळा महिना काढायाचा . त्याला पै न पैची काळजी असणारच. आता ह्या वयात रंग्याला काढून दुसऱ्या कुणाला ठेवायचे म्हणजे जीवाला केव्हढा घोर.

वरदान

लेखक भागो यांनी रविवार, 29/08/2021 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
वरदान संध्याकाळचे सहा वाजले की माझी पाऊलं अपोआप हॅाटेल सवेराकडे वळतात. आज पण मी समोरचे कागद बाजूला सारून, कपडे करून बाहेर पडलो. माझ्या नेहमीच्या हॅाटेलच्या मध्ये जाऊन चहा पीत बसणे हा माझा आवडीचा टाइम पास होता. ह्या हॅाटेलची रचना मोठी सुरेख आहे. काही टेबल आंत होती तर काही बाहेर मोकळ्यावर. ज्याची जशी आवड त्याप्रमाणे लोक बसत असत. मी नेहमी बाहेर एका ठरलेल्या जागी जाऊन बसतो. ह्या जागेवरून रस्त्यावरची रहदारी अगदी सहज नजरेस पडते. मी येईपर्यंत शेट्टी त्या टेबलावर रिझर्वची पट्टी लाऊन ठेवत असे. माझ्यापासून शेट्टीच्या हॅाटेलचा खास फायदा होत असेल असे नाही.

जू जू तुला सोडणार नाही !

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 26/08/2021 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनसाईट चे आकर्षण कोणाला नसते? मलाही होते. पण अमेरिका , यूरोप, सिंगापुर, यूएई येथे अनेकदा प्रयत्न करूनही मला कधी संधी मिळाली नाही. मी हताश झालो होतो आणि ऑनसाईट हे आपल्या नशिबात नाही असे मानून आहे ती नोकरी करत होतो. पण ६ महिन्यांपूर्वी अचानक एका दुपारी मला युगांडा मधून एक फोन आला. तिथल्या एका बँकेत त्यांना माहिती सुरक्षा सल्लागार म्हणून माणूस हवा होता. प्रथम आफ्रिकेत जायला मी नाखुषच होतो. पण जो पगार मला ऑफर केला होता तो नाकारण्यासारखा नव्हता. शेवटी मी ती ऑफर स्वीकारली आणि rtpcr आणि यलो फिवर लस अशा अनेक दिव्यातून पार पडत युगांडात पोहोचलो.