Skip to main content

कथा

ध्रांगध्रा - १३

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/01/2022 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच कोणीतरी इथे वावरतय. स्वच्छता ठेवतय. ..... पण मग पूजा..... फुले काहीच कसं नाही. तसं पूजा करायला इथे देवाची मूर्ती ही नाहिय्ये म्हणा. त्या अष्टकोनी गाभार्‍याच्या कानाकोपर्‍यातून माझ्या कॅमेर्‍याची नजर फिरतेय. एका कोपर्‍यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.
मागील दुवा ध्रांगध्रा - १२ http://misalpav.com/node/49783 मी कॅमेरा डोळ्यासमोरून बाजुला करतो. त्या बाजूला एक दार दिसतय.पहाणाराला पटकन दिसणार नाही असं भिंतीतल्या नक्षीत चपखलपणे लपवलेलं. त्यामुळेच कदाचित मघाशी दिसलम नाही. ते दार उघडलय.

ध्रांगध्रा - १२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 14/01/2022 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
" शिवा. शिवा. अरे हे बघ. इकडे बघ. हे काय आहे" महेश उत्सूकतेने ओरडतोय. उत्सूकता की काय समजत नाही. पण ती तीस पावले मी धावत जातो. डोंगराला वळ्या पडाव्या तसं वर आलेलं ते टेकाड गाठतो.महेश मला हात करून दाखवतो. डोळ्यावर विश्वास बसत नाहीये मागील दुवा ध्रांगध्रा - ११ http://misalpav.com/node/49775 डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्या टेकाडावरून पुढे थोडे खाली एक मंदीर दिसतय. थोड्या वेगळ्या पद्धतीचे मंदीराचा कळस दिसतोय. त्या नंतर लगेचच पायर्‍या.खाली उतरत जाणार्‍या. पायर्‍या समोर सोंड वर केले दोन दगडी हत्ती. अगदी खरेखुरे वाटावेत असे. हत्तींच्या सोंडेत दगडी हार.

ध्रांगध्रा - ११

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 12/01/2022 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही का असेना शिवासाठी काम झालंय हे महत्वाचं. मंदीर आहे हे निश्चित झाले. आणि तिथे कस्म जायचं ते समजलंय . या क्षणी आम्हाला या पेक्षा कसलीच माहिती नको आहे. त्या माणसाला तिथेच सोडून आम्ही उजवी कडची वाट धरतो मागील दुवा ध्रांगध्रा-१० http://misalpav.com/node/49772 "बघ काम झालं आपलं. आता थोडाच वेळ. ते देऊळ पाहू." देऊळ कुठे आहे ते समजल्यामुळे महेश खुशीत आलाय. " गंमत आहे ना... या गावची. सकाळपासून भेटलेल्या सगळ्या माणसांचे चेहरे अगदी एकसारखे. हुबेहुब. कसलं भारी ना" शिवा खुशीत आल्यामुळे माझ्याही डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झालंय. " त्याचं काय असेल....

ध्रांगध्रा - १०

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/01/2022 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याच घरात काही हालचाल दिसत नाहीये. थोडे पुढे आलोय. समोर एक माणूस , एक बाई आणि त्यांचा हात धरून चालत जाणारे एक लहान मूल पुढे जाताना दिसतय.चला निदान कोणीतरी दिसलं तरी. चला यांना विचारूया. आम्ही भरभर चालत त्या कुटुंबाला गाठतो. नमस्कार दादा..... मागील दुवा ध्रांगध्रा - ९ http://misalpav.com/node/49763 नमस्कार दादा... आम्हाला मंदीरात जायचंय. कसं जायचं हो? मी मागूनच प्रश्न विचारला. त्या तिघांनीही माना वळवल्या. आम्ही दचकतो. त्या पुरुषाचा , त्याच्या बायकोचा आणि त्या लहान मुलीचा तिघांचेही चेहरे हुबेहूब . अगदी साच्यातून काढावेत तसे.

सरकार

लेखक पाटिल यांनी मंगळवार, 11/01/2022 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज. आता तुम्ही म्हणाल की बरं मग? तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे. आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही. अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील. किंवा करू करू म्हणता येईल. शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..! रोज रोज एकटेच कसे बसणार..! बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही.

सोनं

लेखक सरिता बांदेकर यांनी मंगळवार, 11/01/2022 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सोनं “अरे ए बबन्या,काय खबर मिळाली की नाही?” डुगऱ्यादादाचं डोकं गरम झालं होतं. सालं चार महिने झाले एक पण मोहिम यशस्वी नाही झाली.या लॅाकडाऊनमुळे एक तर ट्रॅफीक बंद.लोक फिरायला बाहेर पडत नाहीत त्यामुळे लूट बंद.लग्नकार्य बंद त्यामुळे बायका नटून थटून मिरवत नाहीत.रोकडा पण नाही आणि सोनं चांदी पण नाही.त्यात बार बंद मग हातभट्टीच्या पहिल्या धारेच्या कडक मालाला उठाव नाही. सालं जगायचं तरी कसं. डुगऱ्यादादा कपाळ बडवत बसला होता.बबन्या धावत धावत आला.त्याला धाप लागली होती. “ए बबन्या कुठून एव्हढा भूत बघितल्यासारखा पळत आलायस?”डुगऱ्यादादाने विचारलं. “दादा त्ये पक्क

सल

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 10/01/2022 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सल - अति लघुकथा ---------------------- मैत्रिणीचा फोन आला . अन ... ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो . त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी . आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं . आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ... पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .

ध्रांगध्रा - ९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/01/2022 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतंय. मागील दुवा ध्रांगध्रा - ८ http://misalpav.com/node/49751 मी चाचपडत तोल सांभाळायचा प्रयत्न करतोय. इकडे यिकडे हात करताना मला महेशचा हात हाताला लागतो. मी कसाबसा उभा रहातो. डोळ्यासमोर अजूनही अस्पष्ट पण मघापेक्षा नक्कीच टळक उजेड जाणवतोय. मी डोळे हाताने चोळतो.

ध्रांगध्रा - ८

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/01/2022 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या अगदी सीमेवर खंदक असावा तसा एक छोटासा नाला ,ओढा दिसतोय. वात तिथे संपतेय. आणि तो ओढा ओलांडल्यावर नवीन वाट दिसतेय.ओढ्याच्या काठाशी वाट संपतेय तिथे महेश उभा आहे.. दिसला बाबा एकदाचा. मी झपझप पावले उचलत महेशपर्यंत पोहोचतो. मागील दुवा ध्रांगध्रा - ७ http://misalpav.com/node/49747 बरं झालं बाबा. इथे थांबलास.तुला थाम्ब थांब म्हणत होतो. पण तू आपला बुंगाट." महेश दिसल्यामुळे माझी काळजी कमी झाली पण मघाची नाराजी पुन्हा वर आली. " तू हाक मारलीस? मला काहीच ऐकू आले नाही! उलट मलाच काळजी वाटत होती की तू त्या धुक्यात वाट चुकतोस की काय म्हणून.

धावपटू- शतशब्दकथा

लेखक निओ यांनी गुरुवार, 06/01/2022 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी. बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते. अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले. दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता.