आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते. खत आणायला यजमान तालुक्याला दुचाकीवर गेले होते.पण काळाने घात केला.काकांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यातच काकाचं निधन झालं.आशाबाई तर सैरभैर झाल्या होत्या.रात्ररात्र त्यांना झोप येईना .मुलगा अमेरिकेत शिकायला होता.अजून तीन वर्ष त्याचे क्षिक्षण चालू राहणार होते.तेव्हा आशाबाईना गावकडे एकटीलाच राहावे लागणार होते.
आशाबाईंची गावाकडे सगळ्यांशी जुजबी ओळख झाली होती.पण बरीचशी काम आता त्यांना एकटीने करावी लागतं
होती.आशाबाईंच्या शेजारी सीताताई राहत.मुलगा सून नातवंडे असा भरला संसार होता.घराची लाईट एक दिवस झाला काही कारणाने गेले होती ,तेव्हा आशाबाई सीताताईना मदत मागायला गेल्या.तेव्हा त्यांच्या मुलाने वीज कार्यालयात हेलपाटे मारत ,वीज पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बरीच मदत केली.आणि तिथून आशाबाईना कधीही काहीही मदत लागली की सीताताईं सर्वेतोपरी मदत करत.
दोघी उन्हाळी काम,शेतातली काम मिळून मिसळून करत.पण कधी कधी दुपारच्या निरभ्र उन्हामध्ये आशाताईंच्या मनाशी जोडीदाराने असे ढळत्या वयात अचानक सोडून जाण्याचे दुख: उभारून येत असत.सीताताई बरोबर आपल्या जोडीदाराचे अनेक किस्से त्या सांगून भूतकाळात रमत असत.मधेच पदराने डोळे पुसत वार्धक्याचा पोक्तपणा ओढून घ्यायचा प्रयत्न करीत.सीताताईही ह्या विधवा आणि वार्धक्याकडे झुकलेल्या होत्या.त्यांनाही या पोकळीची जाणीव होती.पण त्यांच्याकडे नातवंडे,सुना मुले मन रमवायला होते.त्यामाने आशाबाईंची पोकळी खूप मोठी होती.आपल्या या शेजारीणी-मैत्रिणीला आता पोकळी भरायला आधार द्यायला हवा हे त्यांनी हेरले होते.
सीताताईंनी त्यांना भजनी मंडळातही सामील करून घेतलं होत.त्या नाद तालात आशाताई हरवून जात.मुळचाच सुंदर आवाज मिळालेल्या आशाताई सुंदर भजने गाऊ लागल्या.सीताताई आणि आशाबाई असे सुंदर भजनाचे समीकरण जोडले गेले होते.अध्यात्माची वाट आणखीनच भक्तिमय झाली होती.आशाबाईनी आता ग्रंथांचा अभ्यास करत निरूपणाची वाट धरली होती.अभ्यासाचा व्यासंग भरपूर वाढवत त्यांनी बरीच टिपण काढली होती.हळू हळू अध्यात्माच्या सानिध्यात दोन वर्षे सारून गेली आशाबाई आणि सीताताई यांची मैत्री आता घट्ट झाली होती.आयुष्यात अचानक आलेली पोकळी नाहीशी झाली होती.
आशाबाई दोन वर्षांनी मुलाकडे परदेशात राहायला गेल्या होत्या.अचानक निर्माण झालेली पोकळी मैत्रिणीच्या साथीने भरून निघाली होती.आशाबाईनी मैत्रीचा रोपं म्हणजे आध्यात्मिक भजने मंडळ परदेशात सुरु करत त्याचा वटवृक्ष केला होता.
-भक्ती
जून २०२१
वाचने
7271
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत सुंदर बालकथा...
बालकथा..
In reply to अत्यंत सुंदर बालकथा... by गॉडजिला
अरे हो असा विचारच नव्हता केला
In reply to बालकथा.. by Bhakti
गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ
In reply to अरे हो असा विचारच नव्हता केला by गॉडजिला
+१
In reply to गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ by पाषाणभेद
__/\__
In reply to +१ by Bhakti
गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ
In reply to __/\__ by पाषाणभेद
गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ कथा आहे.Disagree... मे बी काही काळाने मला किंवा तुम्हाला समजून जाईल हे नक्की काय आहे ते...वा !
कथा छान आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessanधन्यवाद कुमारजी,मदनबाणजी!
पडत्या काळात
नवीन जोडायला गेलेले लोक
In reply to पडत्या काळात by कंजूस
शिव खेरांचा यू कॅन विन मधील
In reply to नवीन जोडायला गेलेले लोक by Bhakti
शिव खेरा नाही माहित,पण मैत्री
In reply to शिव खेरांचा यू कॅन विन मधील by गॉडजिला
पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती
In reply to शिव खेरा नाही माहित,पण मैत्री by Bhakti
पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती टिकायला शिकवावं नाही लागतं.:)About friends, we don't have to like them... we need them ;) हा हा हा असो शब्दखेळात न पडता त्याचा मतितार्थ हा आहे की तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा भलेही मैत्री मोजक्या लोकांशी टिको :)मग बरोबर आहे. ;)Be natural!Be
In reply to पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती by गॉडजिला
छान.
धन्यवाद जागुजी.
In reply to छान. by जागु
यानिमित्ताने एक कविता :):
यानिमित्ताने एक कविता :):
व्वा, खुप आशादायक आणि प्रेरक
👌
म्हणतात ना "जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे" किंवा "जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारों"