भक्षक ....!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about भक्षक ....!
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
********************************************************************
"ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? "
गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या.... सगळेच रम्याच्या मागे लागले.
"सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?"
"आरं... आरं... वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?"
रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्यात सरकवली.