आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर.
मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली.
कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर.
परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप.
शाळेत जायची सकाळीच. सायकलीवर. कराटे शिकायला. लाथा झोडायची. पोरं पुन्हा चिडीचूप.
तिच्या मैत्रीणी उच्च. तिचं अक्षर सुंदर. पायातले बूट गुलाबी. दिसायला मात्र काळुंद्री. हे तेव्हा कळलंच नाही. बहुतेक तिलाही.
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची.
एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.
आक्कीचं लगीन झालं. आक्कीचा नवरा टकला.
मग आक्की आली फटफटीवर बसून. लांबून निघून गेली. आम्हाला दिसलीपण नाही.
आक्की यायची. आक्की जायची. आम्हाला कधीच नाही दिसायची. मग आक्कीच्या आठवणींचा ऊन्हाळा आम्ही बर्फाच्या गोळ्यात भिजवला. जो पुन्हा कधीच आला नाही.
मग आक्की आली. मागं पिलावळ घेऊन.
राहिली आमच्या घरी. आयशीनं तिला कधी नाही ती साडी चोळी दिली. गालावर हात फिरवून बोटं मुडपली. पोराबाळांना खायला बिस्कीटाचा पुडा दिला. मोठ्ठा पारले.
मग आक्की येतच राहिली. आमच्या घरी येऊन गप्पाटप्पा. मग आमरस पोळी. मग आयशीला प्रणाम करुन माघारी जातच राहिली.
मग पुन्हा काहितरी बिनसलं. मग आक्कीनं घरी येणं पुन्हा बंद केलं. आली गेली आक्की आम्हाला कधी दिसली नाही. मग तिच्या आठवणींचा ऊन्हाळा आम्ही पुन्हा बर्फाच्या गोळ्यात भिजवला.
मग पुन्हा एकदा पाऊस भुरभुरभुरभूर. गाडीला क्रेट बांधले. मग पुन्हा त्यात पेप्सी मिरींडा. परत घरी आल्यावर आक्की दिसली. मागं लटांबर. त्यांचा शेंबूड फुरफुरफुरफूर. मग आयशीनं त्यांना बिस्कीटाचा पुडा दिला. आयशीला प्रणाम करुन आक्की निघाली. फटफटीवर बसून दूर गेली. मागं नुसता धूरच धूर.
वाचन संख्या
4552
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीटंसं कळलं नाही
मलाही कळाली नाही.
In reply to नीटंसं कळलं नाही by पैसा
मला वाटलं मलाच कळालं नाही ,
In reply to मलाही कळाली नाही. by किसन शिंदे
खिक्क
ओह! चुकून अक्की वाचलं! :P
आवडली कथा..
माझ्यामतेही व्यक्तिचित्रणच
.
उचलला हात
खातोस का?
In reply to उचलला हात by भाऊंचे भाऊ
जव्हेरभाऊ
In reply to खातोस का? by जव्हेरगंज
सॉरी बर्का अभ्यादादा...
In reply to जव्हेरभाऊ by अभ्या..
शांती कशाला
In reply to खातोस का? by जव्हेरगंज
(No subject)
व्यक्तीचित्र म्हणून आवडले. पण
पण खूप लहान वाटले लेखन,
In reply to व्यक्तीचित्र म्हणून आवडले. पण by रातराणी
मला वाट्ट्य
मला म्हणायची मेंगळ्या.
In reply to मला वाट्ट्य by इरसाल
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची. एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.मला म्हणायची मेंगळ्या.
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची. एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.