Skip to main content

कथा

ढेकळे

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 17/04/2016 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलछबू रातीचा गाभारा भादवातल्या कुत्र्यासारखा लवलवत होता. गोठ्याच्या शेजारी थोडी जागा करुन गजड्या त्यावर झोपला होता. वारा कितीही थंडगार वाहत असला तरी तो आतुन धुसमुसत होता. पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तो तडफडत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता. आजची रात त्याला बोडक्या बाईच्या अंधाऱ्या खोलीसारखी भकास वाटत होती. जिच्या नैराश्याचे भाले त्याच्या शरीरात भळ्ळकन घुसले होते. वर्षानुवर्षे उभा असलेला एखादा वटवृक्ष एखाद्या जोरदार वादळात उन्मळून पडावा तसा तो अशक्त होऊन अंधरुणावर पडला होता. डोक्यात ना ना विचांरांची शकले चौफेर उधळली गेली आणि तो उठून बसला.

शृँगार ११

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 16/04/2016 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? " " इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . " " अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते . " अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती . " अरे इट्स् ओके चल फाड ६०० ची पावती . मला जरा पटकन जाऊन यायच आहे . " त्यानही अजिबात आढेवेढे न घेता पावती फाडली . मीही निघालो पटकन . बाहेर जाऊन नाष्टा केला . एक चक्कर टाकली आणि परत आलो .

लघुकथा - थांब!

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/04/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा नेहमीचीच गर्दीची वेळ होती.८:५२ ची बदलापूर यायला काही क्षण बाकी होते. महेश ब्रिजवरून धावत धावत येत होता, आपल्या नेहमीच्या डब्याशी पोचण्यासाठी गर्दीतून वाट काढत होता. तो नेहमीच्या जागी जाऊन पोचला आणि उभा राहिला. आज गर्दी जरा जास्तच होती. महेशने मोबाईल बघितला आणि खिशात टाकला. पाकिट, चावी चेक केलं आणि बॅग पुढे घेऊन तयार झाला. ८:५२ ची लोकल आली. चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. ’अंदर जाओ’, ’अरे काय करतोयस यार माझा पाय आहे’, ’उतरू द्या उतरू द्या!’ सगळा कल्लोळ झाला. महेशला कुणीतरी धक्का देऊन मागे लोटलं.

शृँगार १०

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 15/04/2016 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला . फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता .

लघुकथा – नवी कल्पना

लेखक उल्का यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कथेचे नायक आहेत साने आजोबा. साने आजोबा हाडाचे शिक्षक. त्याना निवृत्त होऊन जरी बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांची कडक शिस्त अजूनही तशीच होती. दोन वर्षांपूर्वी घरच्यांनी उत्साहात पंच्याहत्तरी साजरी केली होती. मुले, नातवंडे आपापल्या व्यापात मग्न असल्यामुळे साने आजी-आजोबांना करमत नसे. सतत नवीन विरंगुळ्याच्या नाहीतर गप्पा मारायला माणसांच्या शोधात दोघेही असत. आजोबाना नवनवीन कल्पनाही खूप सुचत.

शृँगार ९

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 13/04/2016 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो. इतर वेळी आयुष्यात फार काही होत नाही , होत नाही म्हणता म्हणता किती काही घडलय गेल्या काही दिवसांमधे . अथांग समुद्र दूरपर्यंत पाहील तिथपर्यंत अगदी क्षितीजापर्यंत . काय आहे क्षितीज ? फक्त एक आभास.... कधी आकाश आणि समुद्र किंवा आकाश आणि जमीन भेटतात का ?

लघुकथा - इच्छापूर्ती

लेखक उल्का यांनी बुधवार, 13/04/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. कुठेतरी वास्तवाशी मिळताजुळता प्रसंग. सहअनुभूतीतून सुचलेली काल्पनिक कथा आणि काल्पनिक पात्रे.) भर दुपारी रस्त्याच्या कडेकडेने इकडे तिकडे बघत, वाटेत येणाऱ्या छोट्या छोट्या दगडांबरोबर फुटबॉल खेळत, हातातल्या काठीने चालता चालता मातीवर रेघोट्या ओढत चालणारा सुम्या (सुमीत) अचानक थबकला. त्याच्यापुढे काही अंतरावर चालणाऱ्या काकांच्या खिशातून रुमाल काढताना पाकीट पडलेले त्याने पाहिले. धावत जाऊन त्याने ते उचलले आणि काकांना हाक मारली. "ओ काका, पाकीट पडलं बघा." काकांच्या डोक्यात कामाची घाई होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या कानातून मेंदूत हे वाक्य झिरपले नसावे.

पाणी-प (गद्यविडंबन)

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी मी सुभाष अवचटांचं "खिडकी" या नावाचं पुस्तक वाचलं. त्यातिल काही कथा मला आवडल्या.

बळी

लेखक विजय पुरोहित यांनी बुधवार, 13/04/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
(अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील अगदी ग्रामीण भाग. एक छोटंसं शहर. सन 2016. गावापासून थोडंसं लांबच असलेलं एक उदासवाणं, काळोखं दिसणारं जुनाट पद्धतीचं घर.) दारावरची बेल वाजते. श्री. स्टीफन्सन जाऊन दार उघडतात. समोर एक हसतमुख, उमद्या व्यक्तिमत्वाचा डिलीव्हरी बॉय उभा आहे. तो त्यांच्या हातात तत्परतेने एक पार्सल देतो. श्री. स्टीफन्सन यांना अपेक्षित वस्तु पोहोचलेली आहे. त्याला पाहून ते मंदस्मित करतात. डिलीव्हरी बॉय पावतीवर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि लगेच माघारी वळतो. लगोलग श्री. स्टीफन्सन घरात येतात आणि त्या वस्तूला लावलेली वेष्टणे अधीरपणे फाडून टाकतात.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.