मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

सोम्या बाबा.

Deepak Pawar ·
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती. "हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं. "रुसलाय," आई म्हणाली. "कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला. "त्याला गाय हवेय," आई म्हणाली. "काय बाई आक्रितच?" "गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली. मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो. "जेवलाय पण नाय," आई म्हणाली. "काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय?

गूढ कथा: अक्कल दाढ

विवेकपटाईत ·
(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

अपहरण - भाग ३

स्मिताके ·
भाग २ - https://misalpav.com/node/51954 या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता. "अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा. आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील. सरकारने खंडणी मंजूर करून ती सार्वजनिक ठिकाणी आमच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येईल.

द्वेष्टे -भाग 2

नूतन ·
त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता. जर काही अभद्र घडले असेल तर.... तर मी जिवंत राहू शकणार नाहीं...तो स्वताशी म्हणाला.डॉक्टरांना घेऊन तो आत दिवाणखान्यात शिरला .अस्वस्थपणे तो आपले हात चोळत होता. तिथे असलेली शांतता पाहून तो म्हणाला, 'इथे काही गडबड गोंधळ दिसत नाही त्याअर्थी अजूनपर्यंत तरी सारे ठीक दिसते आहे.' दिवाणखान्यात कसलेहीआवाज किंवा कुणाचीही चाहूल नव्हती. प्रकाशाने उजळलेले ते घर गाढ झोपी गेल्यासारखं दिसत होतं.

द्वेष्टे -भाग 1

नूतन ·
सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखाॅव यांच्या Enemies/एनिमीज कथेचा हा भावानुवाद. ज्यानी वाचली नसेल त्यांच्यासाठी आणि वाचली आहे त्यांच्यासाठीही.कारण त्यांच्या अनुवादाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ] सप्टेंबर महिन्याच्या त्या काळरात्री सुमारे दहा वाजता, झेम्स्टवो डॉक्टर (जिल्हा प्रशासनाचा डॉक्टर) किरीलोवचा ,एकुलता एक,सहा वर्षांचा लहानगा अँड्री घटसर्पाने मरण पावला. डॉक्टरची पत्नी आपला लाडक्या मुलाच्या खाटे समोर गुडघे टेकून बसली आणि दुःखातिरेकाने तिने टाहो फोडला. इतक्यात दरवाजावरील घंटी कर्कशपणे वाजली.

अपहरण - भाग २

स्मिताके ·
९ जूनला सकाळी अकरा वाजता वॉशिंग्टन पोलीस खात्याच्या प्रमुखांना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर बायरन्स राज्यसचिवांच्या घरी गेले, आणि त्यांच्या खाजगी भेटीची मागणी केली. तिथे खूप गडबड उडाली होती. सर्व राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती तिथे हजर होत्या. त्यांची व्हिजिटिंग कार्डं आत पाठवली जात होती. त्या भयंकर बातमीवर तावातावाने चर्चा झडत होत्या. टपाल खात्यातून येणाऱ्या तारांचा तर जणू पाऊस पडत होता. त्या भयानक घटनेमागे काहीतरी राजकीय कट किंवा कसलातरी बदला घेण्याचं कारस्थान असल्याचा संशय हळूहळू पक्का होऊ लागला होता. नेतेमंडळी उदास चेहऱ्यांनी एकमेकांशी कुजबुजत होती.

असा मी असामी.

भागो ·
माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक ललित वाचून मला धक्का बसला. ह्या लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला. तर त्यात ह्या नावाचा कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला कि हल्ली काय लोक टोपणनाव नाव घेऊन लिहितात. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा काय भरवसा? पण त्यात लेखक असा कोणीही नव्हता. सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. लिहायला वेळ कुठून काढणार? बिचारा गुप्ते मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनच्या विवंचनेत गुंतलेला.

अपहरण - भाग १

स्मिताके ·
८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी. असं काय घडलं होतं म्हणता? न्यू यॉर्क ट्रिब्यूनने ठळक मोठ्या लालभडक अक्षरांत फलक लावला होता. "अनपेक्षित दुर्घटना. भयंकर गूढ परिस्थिती. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गायब. दोन नोकर गुदमरल्या अवस्थेत सापडले.

पैज.

भागो ·
मी आपला माझ्याच धून मध्ये गाडी चालवत होतो. शिल्पा रावची गाणी ऐकत. कलंक नाही... हवाके साथ साथ. घटाके संग संग. रस्ता असा कि जणू तेरी चाल है नागीन जैसी. माझी गाडी म्हणजे जुना खटारा. मेकानिक म्हणतो, “आता बस झालं. मी पण कंटाळलो. मोडीत काढा. कंडम गाडी. भंगार मध्ये टाका. दुसरी घ्यायला झालीय.” अरे वा रे वा. ह्या गाडीचा आणि माझा जनम जनम का रिश्ता आहे. तिला अशी कशी टाकून देऊ? माझी जीवन साथी. कधी कधी रुसते पण थोडी मरम्मत केली तेल पाणी टाकले कि लगेच हसते. तेव्हड्यात एका भारी गाडीने मला ओव्हरटेक केलं. माझ्या समोरच ती जात होती. लेटेस्ट टॉप मॉडेल. एक तरुणी ती गाडी चालवत होती.

रहस्यकथा भाग ८ व ९

म्हया बिलंदर ·
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.