Skip to main content

कथा

काहीतरी नक्कीच आहे....२

लेखक सतिश पाटील यांनी शुक्रवार, 06/10/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरील आधीच्या लेखाची लिंक खाली काहीतरी नक्कीच आहे... प्रसंग ५- भावाचे लग्न झाले होते म्हणून मी अणि बायको, जवळच असलेल्या आमच्या दुसरया घरी रहायला गेलो होतो. ते घर दुमजली होते. वरच्या अणि खालच्या मजल्यावर भाडेकरू ब्याचलर मुले बरयाच वर्षांपासून राहत होती. आम्ही रहायला आल्यावर खालची मुले दुसरीकडे रहायला गेली. त्यांचा आजुबाजुच्या लोकांना कधीच त्रास न्हवता अणि त्या मुलांना देखिल कुणाचा त्रास कधी न्हवता. तिथे जवळच माझा शाळकरी मित्र मंग्या राहत होता. त्यामुळ त्याला सारा परिसर चांगलाच महित होता.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग २ )

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 05/10/2017 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
जितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतेय तेव्हढीच ओढली जातेय मी त्याच्याकडे काय होतंय मला कळत नाहीये , का आणि कस होऊ शकत असं माझ्या बाबतीत , आणि सरळ बोललेही नाही त्याच्याशी इतके दिवस . काय होतंय दुसरं काही नाही पण friend म्हणून बोलायला काय हरकत आहे , आणि इतके दिवस बोलत होतोच कि आपण , त्याला काय होतंय , बस जे वेगळं वाटत होत त्याचा विचार नको करायला . एक friend म्हणून बोलूया ना . " Hi, कसा आहेस ? " " अरे तुझ्याशीच बोलतेय मी , इकडे तिकडे काय बघतोय . " " तू ... आपलं आपण माझ्याशी बोलताय ?

ये कलरफुल ऐक ना

लेखक पवन तिकटे यांनी बुधवार, 04/10/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये कलरफुल ऐक ना ! आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. ती : काय करतोय मी : हॅलो कोण ?

काहीतरी नक्कीच आहे....

लेखक सतिश पाटील यांनी मंगळवार, 03/10/2017 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेखात शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत. ओफिसमधे वेळ काढून हे सर्व लिहिलय. जमल्यास शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. 'कोणीतरी आहे तिथं!' हा धागा अणि त्यात दिलेले दुवे वाचले अणि माझ्यासोबत घडलेले प्रसंग डोळ्यासमोरून गेले. भुत हा विषय असा आहे की त्यावर विश्वास ठेवावा किंवा ठेवू नए हे ज्याने त्याने ठरवावे. पण काही प्रसंग काही व्यक्तींच्या आयुष्यात असे घडतात, की ते समजणे खुप कठीन आहे. अणि हे सर्वच लोकांसोबत घडतच असे नाहीं.

फसलेल्या उपवासाची कहाणी

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 02/10/2017 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते.

संघर्ष : भाग ०५ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 30/09/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०४ पासून पुढे.. काही वेळानंतर.. (वेळ : संध्याकाळी ६ वा. स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.) सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती. सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं.

दिमाग का दही (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 28/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसचा पहिला दिवस. मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं. सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो. ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला.

भ्रम

लेखक nishapari यांनी सोमवार, 25/09/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराच दिवसांपूर्वी मला अशोक ह्याच शहरात असल्याचं समजलं होतं . तेव्हापासून आज भेटेन उद्या भेटेन अशी चालढकल चालली होती , नक्की दिवस ठरत नव्हता . तोही बेटा बिझी . त्यामुळे भेट पुढे पुढे जात होती . अशोक माझा लहानपणीचा मित्र . माझ्याहून 2 वर्षांनी मोठा होता . काही वर्षं आम्ही शेजारी राहत होतो , त्यानंतर त्याच्या वडिलांची बदली झाली आणि तो बंगलोरला गेला , मी माझ्या कॉलेजच्या नवलाईत हरवून गेलो , तो त्याच्या शिक्षणात . फारसा संपर्क असा ठेवला गेला नाही , कधीमधी फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच . पुढे त्याने सायकॉलॉजी विषय निवडला , मी कॉमर्स मधल्या डिग्र्यांच्या मागे लागलो .

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 23/09/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

संघर्ष : भाग ०४

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 23/09/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०३ पासून पुढे.. १०:४० ला अनिकेतची गाडी सेंट्रल कॅफे समोर येऊन थांबली राधा कॅफेच्या दाराशीच उभी कोणाचीतरी वाट बघत असताना दिसली. अनिकेतने गडबडीने त्याची गाडी पार्क केली आणि तो राधा जवळ येऊन थांबला. त्याला समोर बघून राधा म्हणाली ‘अनिकेत तू लेट आहेस..’ ‘आज अनुला कॉलेज पर्यंत सोडावं लागलं म्हणून थोडा वेळ झाला’ अनिकेत राधाला समजावण्याचा सुरत म्हणाला.. राधा त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली ‘अरे इट्स ओके..