काहीतरी नक्कीच आहे....

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in जनातलं, मनातलं
3 Oct 2017 - 5:00 pm

खालील लेखात शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत.
ओफिसमधे वेळ काढून हे सर्व लिहिलय. जमल्यास शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष करा.

'कोणीतरी आहे तिथं!'

हा धागा अणि त्यात दिलेले दुवे वाचले अणि माझ्यासोबत घडलेले प्रसंग डोळ्यासमोरून गेले.
भुत हा विषय असा आहे की त्यावर विश्वास ठेवावा किंवा ठेवू नए हे ज्याने त्याने ठरवावे. पण काही प्रसंग काही व्यक्तींच्या आयुष्यात असे घडतात, की ते समजणे खुप कठीन आहे. अणि हे सर्वच लोकांसोबत घडतच असे नाहीं. ज्याच्यासोबत घडते त्याला ते अनाकलनीय असल्याने किंवा घाबरून, तो इतरांना सांगतो, काही जण विश्वास ठेवतात तर काही जण टिंगल टवाल्या दुर्लक्ष करतात.
एखादा ऐकीव प्रसंग दुसरयाला सांगताना बर्याचदा तो प्रसंग आपसुकच किंवा सोयीनुसार बदलला जातो म्हणून विश्वास ठेवणे थोड़े कठीन जाते. पण स्वतः सोबत घडलेली गोष्ट दुसर्यांना सांगतो तेव्हा?
मी भुत बघून घाबरलो हे सांगताना निदान मला तरी कुठला मोठेपणा जाणवत नाही, घाबरलो हे कबूल. किंवा मला भुत दिसला म्हणून मी कुणी स्पेशल आहे, लोकांच लक्ष मी माझ्याकडे केन्द्रित केले असे मला तरी वाटत नहीं. बर जे घडले त्यात भुतच आहे का? हेही मी सांगू शकत नाही, पण जे घडले ते समजणे मला तरी कठीन आहे.

पहिला प्रसंग जेव्हा घडला त्याधी नास्तिक होतो, देव वेगैरे अशी काहीच भानगड नसते , लोकांना जी गोष्ट सहज कळत नाही त्याला लोक चमत्कार समजुन नमस्कार करतात आणि लोकांनी आपल्या सोयीसाठी देव नावाची कल्पना इतरांच्या डोक्यात वसवली अणि त्याचा आता व्यावसायिक आणि आर्थिक फायदा करुन घेतात, अशी माझी समज होती. अर्थातच देव नाहीत तर भुतही नसतात.
खाली दिलेल्या प्रसंगावर सर्वांनी विश्वास ठेवावा अशी माझी अपेक्षा नाही, अणि टिंगल केली तरी काही हरकत नाही. पण मला हे लिहावसे वाटले.

प्रसंग १-
साधारण २००२-०३ वर्ष असावे, १२वी संपून सुट्ट्या लागल्या होत्या, अहमदनगरला माझा मामा स्थायिक आहे तिथ काही दिवस राहून मी एकटाच माझ्या आईच्या गावी निघालो होतो. प्रत्येक सुट्टीत मी २-२ महीने आईच्या गावीच रहायचो. आईचे गाव कर्नाटकमधे विजयपुर ( आधीचे विजापुर ) जिल्ह्यात बसवन बागेवाडी हे तालुक्याचे ठिकान. तालुका असला तरी हे गाव खुपच लहान आहे. संत बसवेश्वरयांच्यामुळ आमच्या या गावाला ओळख आहे. तालुक्याच्या येष्टी स्टैंड पासून साधारण ३-४ किमीवर शेतात आमचे घर.
रात्री ८.३० च्या सुमारास येष्टितुन उतरलो, इतक्या रात्री गावात कुणी ओळखीच भेटने कठिनच होते म्हणून मग एकटाच ब्याग घेउन घराकडे चालत निघालो. त्यावेळी गावात रिक्शा वेगैरे प्रकार न्हव्ताच. मुद्देबिहाळ अणि तालीकोट ला जाणार्या त्या रस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटतो ग्रामसड़क. तिथून ३.५ ते ४ किमीवर शेतात आमचे घर. रस्त्यावर पूर्ण अंधार अणि मी एक हातात ब्याग घेउन चाललो होतो. त्यादिवशी गुढी पाडवा होता, अणि गुढी पाडव्याला अमावस्या असते हे नंतर समजले. मला अंधाराची कधीच भीती वाटत न्हवती, या रस्त्याला रात्री मी खुप वेळा एकटा गेलो आहे, रात्री शेतात पाणी द्यायलाही मला कधी भीती वाटत न्हवती. अंधारात रस्त्याचा अंदाज घेत रमत गमत चाललो होतो, मधेच रस्त्याकडेला असलेल्या एखाद्या घरातील अंगणात लावलेल्या बल्ब्चा अंधुक प्रकाश त्या रस्त्यावर पडत होता. तेवढ्य भागातून पुढे गेल्यावर अंधार अजुन गडद वाटायचा. इतक्यात पाठीमागून येणार्या एक M-80 गाडीचा पुसट आवाज आला आणि हेडलाईट दिसली, जागा असेल तर लिफ्ट घेउन जाऊ असा विचार आला. म्हटल गाड़ी जवळ येउदे मग त्याला अड़वू. ५-६ सेकंद झाली असतील गाडी आधीपेशा जवळ आली होती म्हणून मागे पाहिले तरी अजुन बरीच लांब होती, रस्त्यावर त्या गाडीच्या प्रकाशात माझी हलकी सावली चालताना दिसत होती, अणि माझ्या बाजुलाच माझ्या थोडच मागे एक सावली अजुन दिसली चालताना. धोतर घालणारी माणसे धोतराची एक बाजु हातात धरून ऐटित चालतात तशी. म्हटले हा मनुष्य आपल्या ओळखीचा आहे का पहावे म्हणून मागे पाहिले तर कुणीच नाही, एव्हाना ती गाड़ी अजुन जवळ आली होती, समोर सावलीत स्पष्ट दिसतय की मी एक हातात ब्याग धरून चाललोय अणि बाजूला आजुन एक सावली धोतर घातलेल्या व्यक्तीची. पुन्हा मागे पाहिले तर कुणीच नाही, अणि सावलीत तर स्पष्ट दिसतय, अणि ती M-80 बाजूने निघून गेली.

अक्षरशः नखशिखांत हादरलो. हा भास् न्हवता, अणि मी झोपेतही न्हव्तो, अणि पूर्ण शुद्धीत होतो. जे पहिल त्यावर माझाच विश्वास बसत न्हवता. माझ्याबाजुलाच कुणीतरी माझ्यासोबत चालतोय अणि मला फक्त सावलीत दिसले. घर अजुन लांबच होते, आजूबाजूला पूर्ण अंधार, बोम्बलालो तरी कुणी येणार नाही, हातातली ब्याग टाकुन द्यावी अणि तराट पळत सुटावे असे वाटले.पण घर लांब असल्याने पलून दम लागेल अणि जर त्या भुताने आपल्याला पकडले तर प्रतिकार करता येणार नाही म्हणून, तसाच चालत राहिलो, आज मी खपलो. काही खरे नाही आज, आपल्या बाजूला कुणीतरी चालतय अणि आपल्याला ते दिसत नाही, भुतच आहे. तसाच तोंडातल्या तोंडात राम राम करत निघालो. हा रस्ता संपता संपत न्हवता. हृदयाची धडधड कानाला ऐकू येत होती. अंधाराची भीती का्य असते हे तेव्हा मला समजले. हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाही. थोड्या वेळात रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ओळखीचे घर आले, ब्याग डोक्यावर घेउन सरळ त्या घरात घुसलो. जीव वाचल्याचे समाधान वाटले.
हा मुंबईचा पप्या कधी आपल्याशी बोलत नाही कधीच घरी न आलेला, आज एवढ्या रात्री एकटा अणि ब्याग घेउन आपल्या घरी कसा का्य आला म्हणून त्यांना आश्चर्य वाटले होते.
प्यायला पाणी दिले आणि विचारले की एकटाच आलास का्य मुंबईवरून? मी म्हटले नगरवरुन आलोय एकटाच पण मी रस्ता विसरलो घरी जायचा. तेव्हा का्य समजायचे ते त्यांना समजले, त्यांनी एक माणुस पाठवला माझ्यासोबत घरापर्यंत. आज्जी अंगणातच होती त्या माणसाला सोबत पाहून तिला देखिल आश्चर्य वाटले, मला विचारले का्य झाले, अणि मी जे घडले ते सांगितले. तिथेच मीठ वेगैरे घेउन मला ओवाळले. घराच्या बाहेरच.
भुत वेगैरे मी फक्त ऐकून होतो, पण बहुतेक आज अनुभव घेतला, इतका मी कधीच घाबरलो न्हव्तो. आजीच्या बाजुलाच झोपलो, आजीला विचारले की भुत असतात का? यावर ती काहीच बोलली नाही. मला म्हणाली झोप तू सकाळी बघू.

प्रसंग २ –
दूसरा अनुभव देखिल थोड्याच दिवसात आला. तिथेच.
आईच्या चुलत भावाचे लग्न होते, त्याचे घर आमच्या समोरच होते शेतात. त्यामुळ आई वेगैरे गावी आले होते. त्या लग्नासाठी घरातल्या स्वयपाक घरात काहीतरी खाऊ बनवायचे काम चालू होते. सिगरेट पिण्याची सवय होती ( कोलेजात असल्यापासूनच ). रात्रीच्या जेवण झाल्यवर रोज घराच्या मागे अंदाजे ५० मीटरवर चिंचेच्या झाडाखाली बैलगाड़ी होती, तिच्या दांडीवर बसून फुकायचो. त्या रात्री देखिल टमरेल उचलले आणि विधीच्या नावाने फुकायला निघालो. बैलगाडीच्या दांडीवर बसलो अणि टमरेल खाली पायाशी ठेउन अंधारात धुर काढायचा कार्यक्रम चालू होता. इतक्यात मागुन कुणीतरी आल्याची चाहुल लागली मला वाटले मामी आली आहे.. सिगरेट तशीच हातात लपावली जेणेकरून ती पेटली आहे हे समजू नये म्हणून अणि आपण पकडले जाऊ नए म्हणून. ती व्यक्ति फारच जवळ आली. तिच्या पावलांनी मातीचा आवाज अगदी स्पष्ट येत होता, ती इतक्या जवळ आली की मागुन की फक्त स्पर्श व्हायचाच बाकी होता. मला वाटले मामीने आता आपले सिगरेट प्रकरण पकडले. घाबरून अणि खजील होऊंन मी सिगरेट तिथेच टाकली अणि टमरेलमधले पाणी ओतून गप मान खाली घालून घराकडे आलो. वाटले मामी येइल आता मागुन पण कुणी आलेच नाही. कोण आले होते हे खात्री करुण घेण्यासाठी बहिणीला हळूच विचारले, तर ती म्हणाली बाहेर कुणीच आले नाहीये. तडक आत शिरून पाहिले तर मामी लाडू बनवत होती, अणि घरातले सगले तिथच होते. मग बाहेर कोण आले होते? आसपासच्या मोजक्या घरातून तिथे कोणी येण्याची शक्यताच न्हवती.
घरातली ब्याट्री घेउन पुन्हा तिकडे गेलो. तर तिथ कुणीच नाही. मागोमाग आजी देखील आली अणि फरफतट मला घेउन गेली. तो पर्यंत नुकताच घडलेल ते सावलीचे प्रकरण विसरून देखिल गेलो होतो.
घराच्या अंगणात सगळ जमलेच होते. आजीने पाठित धपाटे घालून पुन्हा दृष्ट वेगैरे काढली. तुझ का्य गठुड पुरलेल हाय तिथे? रोज रात्री घराबाहेर कशाला जातोस म्हणून आईनेही २-४ धपाटे घातले.
ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्ति जरी तिथे आली असती तर एवढ्या रात्री इथे कोण बसलय का्य करतेय असे नक्की विचारले असते, पण फक्त पठिमागुन जवळ येउन काहीच कसे बोलले नहीं?
जर मागे वलूंन पाहिले असते तर कदाचित कोण आहे हे समजले असते किंवा आणखीन काहीतरी विचित्र दिसले असते हे नक्की.

प्रसंग ३-
वडिलांची आई म्हणजे आजी ही गावी एकटीच रहायची. तिला मुंबईला करमत न्हव्ते म्हणून ती गावीच रहायची. ती स्वभावाने जरा विचित्र होती. ती कधीच कोणाशी सरळ वागत न्हवती. सगळ आपले शत्रु आहेत असेच तिला वाटायचे. ती माझ्याशी कधीच बोलायची नाही अणि मला देखिल तिचे वागणे पटत नाही म्हणून मी ही तिच्याशी बोलत न्हव्तो.
एके दिवशी भल्या पहाटे ४ च्या सुमारास मला स्वप्न पडले की आजी वारली. ते स्वप्न पाहून दचकन जाग आली. जशे डोळे उघडले तसा आमचा लैंडलाईन फोन वाजायला लागला. मी घाबरलो होतो त्यामुले तसाच बिछान्यावर पडून होतो, आईने फोन उचलला आणि पलीकडून बातमी आली की आजी वारली. घरात रडारड सुरु झाली अणि गावी जायची तयारी सुरु झाली. मी तरी देखिल तसाच निपचित पडून होतो, सांगू का नको विचार चालू होता, शेवटी आईला सांगितले की मला हे स्वप्नात दिसले आणि फोन वाजला. आई काहीच बोलली नाही आणि मला सोडून सगले गावी निघून गेले.
आता तिचा आत्मा वेगैरे मला स्वप्नात येउन सांगुन गेला असेल का? अणि माझ तिच कधी पटतच न्हव्ते तरी तिने मलाच का निवडले?
का हा निव्वळ योगायोग होता?

प्रसंग ४-
माझ्यानंतर भावाचेही लग्न झाले, घरात जागा अपुरी पडत होती त्यामुले मी जवळच असलेल्या आमच्या दुसरया घरी रहायला गेलो. काही दिवसांनी आमच्या जुन्या घराच्या बाथरूमच्या टाइल्स मधून रक्तासारखे काहीतरी झिरपत होते.. बरेच दिवस हे चालू होते. का्य प्रकार आहे हे समजत न्हव्ते. गावी एक मानुस आहे वडिलांच्या ओळखीचा जो देवदेव करतो त्याला वडिलांनी ही गोष्ट सांगितली.
तर त्याने शयनगृह नीट तपासायला सांगितले, त्याने सांगितल्याप्रमाणे नीट शोधाशोध केली असता पलंगाचा जो भिंतीकडेचा कोप्र्यातला पाय आहे त्या पायाला कापडात काहीतरी गुंडाळलेले दिसले. त्या गावाकडच्या माणसाने ते तिकडे घेउन येण्यास सांगितले. तिकडे नेउन जेव्हा ते उघडले तेव्हा त्यात काळी बाहुली आणि बरेच काहीतरी सापडले. तो मानुस म्हणाला की हा करणी प्रकार आहे. जी आई वडिल आणि भाऊ या तिघांवर केली आहे. लवकर सापडली म्हणून बरे झाले नाहीतर तिघंपैकी एक जण नक्कीच स्वर्गवासी झाला असता. पण हा सगळा प्रकार का्य आहे अणि घरात कोणी केला? अणि का?
तर त्या व्यक्तीने सांगितले के हे सर्व माझ्या भावाच्या बायको आणि सासूने केले आहे.

माझे वडिल आणि भाऊ हे सरकारी कर्मचारी. भावाचे लग्न अरेंज म्यारेज पद्धतीने झाले. ती मुलगी वकिलाचे शिक्षण घेत होती आणि तिचे वडिल निवृत्त सैनिक. मुलीचे बाहेर कुठेतरी अफेर होते अणि मुलगी लग्नाला तयार न्हवती तिच्या आई वडिलांनी जबरदस्ती केल्यामुळ ती लग्नाला तयार झाली. हे सारे त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवले. लग्नाच्या दुसरयाच दिवशी त्या मुलीने भावाला सर्व सांगितले अणि म्हणाली माझ्यापासून दूर रहायचे. नंतर तिने रोज तिच्या आईला फोन करून मला इथे मानसिक अणि शारीरिक त्रास वेगैरे दिला जातो हे सांगायला लागली. अर्थातच हे ती खोट बोलत होती. अर्धवट का होइना पण ही मुलगी वकील आहे म्हणून आम्हीच गप्प होतो शेवटी तिच्या आईला इथे बोलावले की जेणेकरून तिची आई तिची समजुत घालेल. पण इथे तिची आईच तिला सामिल होती. ती आली आणि २-४ दिवस राहिली.
एके दिवशी घरी या तिघिच होत्या अणि आई कपडे धुवायला बाथरूममधे गेली असता १० ते १५ मिनिटात या दोघिन्नी अक्खा पलंग सावधपणे हलवून कापडात हे सगळ ठेउन पलंग परत पूर्वीसारख केल.
आणि हे करण्याचा हेतु असा होता की त्या दोघांमधे शारीरिक संबंध होऊ नये. का ते माहित नाही. हे सगळ समजन्याच्या आधी भावाने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही करुन पहिला होता.
त्या मुलीला कायमचे तिच्या घरी पाठवले आणि घरात आमच्या इच्छेने एक होम केला, त्यानंतर ते टाइल्स मधून रक्त झिरपने थांबले
पण घरात करणी झालिये हे त्या गावाकडच्या माणसाला तिथे बसून कसे समजले? आणि हे भावाच्या सासूने केलय हे पण त्याला कसे कळले ? अणि होम केल्यावर ते रक्त झिरपने थांबले कसे?

क्रमश;...

कथा

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

3 Oct 2017 - 6:28 pm | सतिश म्हेत्रे

असे अनेक अनुभव वाचलेले व ऐकलेले आहेत. पण बहुतेक केसेस मध्ये हा भास असतो. समजा भूत आहे हे मानले तर देव आहे हे ही मान्य केले पाहिजे. अणि जो पर्यंत हे सर्व कोणी पुराव्यानिशी सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण तर नाही बुवा विश्वास ठेवणार यावर..
अधिक माहितीसाठी अंनिस च्या कार्यकर्त्यांना भेटा.

संजय पाटिल's picture

3 Oct 2017 - 6:34 pm | संजय पाटिल

!!!!!!

अभ्या..'s picture

3 Oct 2017 - 7:28 pm | अभ्या..

लकी यु आर

पैसा's picture

3 Oct 2017 - 7:58 pm | पैसा

शेकोटीच्या बाजूला बसून ऐकायच्या कथा!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2017 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

@त्या रात्री देखिल टमरेल उचलले ››› https://emojipedia-us.s3.amazonaws.com/thumbs/120/emojidex/112/ghost_1f47b.png

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2017 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

तेंव्हा मीच होतो तिथे. अश्या जागी मी असतोच्च! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

अभिजीत अवलिया's picture

4 Oct 2017 - 12:52 pm | अभिजीत अवलिया

गुड माॅॅर्निंंग पथकाचे सदस्य झाले बहुतेक गुर्जी.

अनुभव १ व ४ भयानक आहेत. तुमच्या भावाशी फार चुकीचे वागलेत मुलीकडचे.

तेंव्हा मीच होतो तिथे. अश्या जागी मी असतोच्च

बरोब्बर.. तुम्ही नेहमी तशाच्च जागी असता.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2017 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

आणी तुम्ही त्यामागे.. ;)
जसे इथे! =))

मंदार कात्रे's picture

4 Oct 2017 - 12:04 am | मंदार कात्रे

आपले अनुभव चांगल्या रीतीने शब्दबद्ध केले आहेत

पुढच्या वेळेस शुद्धलेखनाच्या चुका टाळा

उत्कन्ठावर्धक लेख

पुलेशु

सतिश पाटील's picture

4 Oct 2017 - 3:46 pm | सतिश पाटील

पुढच्या लेखात शुद्धलेखनाच्या चूका होणार नाहीत याची काळजी घेऊ,

सतिश म्हेत्रे's picture

4 Oct 2017 - 6:50 pm | सतिश म्हेत्रे

चुका आहे ते 'चूका ' नव्हे

दुर्गविहारी's picture

4 Oct 2017 - 11:53 am | दुर्गविहारी

जबरी !!! लवकर टाका पुढचा भाग. असे अनुभव नाकारले जातात पण त्या ही विचारांचा आदर आहेच. असेच अनुभव जीम कॉर्बेटने लिहीले आहेत.
आणि हो आत्मुबुवापासून सावधच रहा. ;-)

सतिश पाटील's picture

4 Oct 2017 - 3:48 pm | सतिश पाटील

आमची तुलना चक्क जीम कोर्बेटशी?
उरात पुर आला.

ज्योति अळवणी's picture

4 Oct 2017 - 3:39 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलंय

ओरायन's picture

5 Oct 2017 - 5:02 pm | ओरायन

अनुभव कथन चांगले केले आहे. शुद्धलेखन माझे पण चांगले नसले तरी भाषाप्रेमी 'मिपाकरांसाठी' शुद्धलेखन जेवढे आपण चांगले करावे असे मला पण वाटते.
अनुभव हा अनुभवच असतो. जर तो तुम्ही प्रामाणिकपणे समोर मांडला , तर तो भावतोच.
त्याचे विश्लेषण , निष्कर्ष, चूक कि बरोबर,भास कि खरेपणा हे ठरवणे हि नंतरची क्रिया झाली. अर्थात ती क्रिया पण होणे गरजेचे असते.
मी असे ऐकले आहे कि , अमेरिका सारख्या देशात पण यावर संशोधन होत आहे. अर्थात , ' Ghost Hanunters' सारखे tv वरील कार्यक्रम उगाच फालतुपणा (जसे - भुताचा आवाज ऐकणारी मशीन्स) करत असतात. त्यामुळे त्यातील गांभीर्य ( मानले तर - ज्याचा त्याचा प्रश्ण) कमी होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Oct 2017 - 5:56 pm | अमरेंद्र बाहुबली

एक आपला साधा प्रश्न. ती सिगारेट "भरलेली" होती का?

सतिश पाटील's picture

7 Oct 2017 - 11:15 am | सतिश पाटील

नाही साहेब. " भरलेली" मी पीत नाही.

खिंडीतल्या गणपतीचा अंगारा लावा .