जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!
१९६५ चा सप्टेंबर महिना...
लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती.
प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर!
सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती!
विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला!
सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या!
मिसळपाव