जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र
श्री गणेशाला लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत. झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले! बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत.