मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनमान

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

युयुत्सु ·
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय? मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.  आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात.

निघा निघा चिऊताई

अनन्त्_यात्री ·
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

माझी मदतनीस..

आजी ·
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

मार्गी ·
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

सतारीचे बोल

कर्नलतपस्वी ·
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्

घर पाहावे बांधून: २

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे. १. कुठे? आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला. २००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत. तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो.