Skip to main content

जीवनमान

सौजन्याची ऐशी तैशी...

लेखक शितल यांनी बुधवार, 22/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यो आमचा वाडा... या असं हिकडून... वाईच थांबा पर... न्हायी,म्हनलं आमच्या वाड्यामन्दी यायच्या आधी एक गोस्ट इच्चारायची र्‍हायली... तुमच्या आंगी सौजन्य हाये न्हवं? मंग झालं तर... का सांगतुया की... आमच्या वाड्या मन्दी येकून बिर्‍हाडं म्हन्ताल तर खालच्या आंगाला पाच आन वरच्या अंगाला दोन. तुम्हासनी कंच्या आंगाच्या लोकासनी भ्येटायचं हाय त्ये आदुगर कळालं पाईजे म्हंजी म्या तुम्हासनी बराबर न्येतू की नाय त्ये बघा... तर बघा खालच्या आंगाच्या लोकांची गुन-इशेश सांगते... तर ह्ये हाय यकदम कोपर्‍यात राहानारं दिंडोरे कुटुंब... म्हनावं तर पाच माणसंच घरी नवरा बायको आनी दोन ल्येकी आन येक शेंबडा ल्योक...

घर

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 18/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

द्रोणीय परिस्थिती!

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 18/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल अचानक पाऊस आल्यावर "द्रोणीय परिस्थिती" होती म्हणून अचानक पाऊस आला असे म्हणायची प्रथा आहे. पुर्वी हाच अचानक पाऊस "कमी दाबाचा" पट्टा असल्यामुळे पडे. हवामान लहरी असते म्हणून असे होत असावे. तरीही एखाद्याला जर एखादा समारंभ उघड्या मैदानात, हिरवळीवर करायचा असेल तर, समारंभाचा रसभंग व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथे तुम्हाला भारतातील कोणत्याही शहराचे हवामान होरा पाहता येईल. शेतकऱ्यांना जर अशी माहिती मिळाली तर फार बरे होईल. http://weather.nic.in/ येथे असलेल्या दुव्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या उपग्रहांनी घेतलेले फोटो पहाता येतील.

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

माझी भटकंती - ओहाय (Ojai)

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 15/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही! तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही..

शीत गोडाऊन..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 14/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं?? सांगते. मित्रहो, बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. ..

चाहूल वसंतऋतूची!!

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 13/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली.