Skip to main content

जीवनमान

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

साडीखरेदीची गोष्ट

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/04/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला.

कावड , टरबुज अन शक्ती !

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 09/04/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते. काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे. एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते. हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?" "ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले. "मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो. "तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन" "अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती!

बाई मी पळाली (एक वैताग कविता)

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 08/04/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
(शहरातल्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न ) बाई मी गेली मॉलला कार्ड घेऊन खरेदीला मॉलच्या बाजुला ऑफर दिसली भुंगा डसल्यासारखी पळत सुटली…. बाई मी गेली ड्रायव्हींग्गला घेऊन पीयुसी हातात कमीन्या गाडीची काचच फुटली सोडली गाडी नी पळत सुटली…. बाई मी गेली डीस्कोला पास नाय मिळाला पबचा रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली डीस्कोला न जाता पळत सुटली….. बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला तिकिट काढून थिएटरला रामूच्या सिनेमानी नजर विटली सोडला सिनेमा नी पळत सुटली….. बाई मी गेली पार्टीला सोबत घेऊन नवर्‍याला वाटेत त्याला खबर भेटली इन्कम टॅक्स ची रेड पडली…… डोकं धरलं नी पळत सुटली…… चू भू द्या घ्या
Taxonomy upgrade extras

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

साठवणीतल्या आठवणी - २ : पोयनाड

लेखक जयबाला परुळेकर यांनी सोमवार, 06/04/2009 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही वरच्या जाहिराती या कधीं कधीं मधल्या कार्यक्रमापेक्षांहि छान असतात. आपल लक्ष वेधून घेणार्‍याहि असतात. त्या दिवशी अशीच पेप्सोडेंटची देढ गुना ची जाहिरात लागली होती. त्यात पर्स मोठी होताना दाखवली. आणखी काय काय दाखवले त्यांत एक फोल्डिंग पेला असा वर उचलून मोठा होताना दाखवला. ते मी बघितल आणि मी म्हटल जय (नातूमहाशय) बघ रे पोयनाडच्या घरी असाच पेला होता. जय म्हणाला यातून पाणी नाहीं का सांडणार? अरे मी खरच पहिलाय, हाताळलाय कित्ती वेळा अस सांगतानाच पोयनाडच्या म्हणजे माझ्या आजोळच्या असंख्य आठवणी, अरेबियन नाईट्ससारख्या सुरस आणि आता चमत्कारिक वाटतील अशा कथा आठवल्या.

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 05/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

'आंबे' त्वा निर्मीयले कवतुके....

लेखक उदय ४२ यांनी शनिवार, 04/04/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत समयी फुले ,परिमळे दिशा व्यापि जो, जयास अवलोकुनी सुरतरुही चित्ती थिजो तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती परिपिकची एकला मधुर वाणि लाधे कृती. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच हे कवन .त्याचा लहानपणी कधी अर्थ कळला नाही , आताही धड माहीती आहे ,असे ठामपणे सांगता येणार नाही.पृथ्वी वृत्ताचं उदाहरण म्हणून तोंडपाठ करून ठेवलेल्या चार ओळी या पलीकडे माझी दृष्टी कधी गेलीच नाही.' 'परिमल ', 'चित्ती थिजो ' 'मधुर 'वगैरे शब्द (शिवाय धडधडीत पुरावा म्हणून ) आम्रवृक्ष असा उल्लेख यावरून आंबे खाण्याशी याचा काही संबध असावा असं माझ्या बालबुध्दीला वाटत असे (हे पिक म्हणजे कोकीळेला उद्देशून रचलेलं कवन आहे असं पुढे कोणीतरी स