Skip to main content

जीवनमान

ए-दिले-नादान

लेखक दशानन यांनी सोमवार, 16/03/2009 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है यही होता है तो आखिंर यही होता क्युं है ! असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ?

आणखी एक निवांत, मोकळा वीकांत

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 16/03/2009 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ. "वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला. "हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी. "बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या (सौ.

काही नोंदी, अशातशाच...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 14/03/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली. बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच.

ह्रदय-ज्योत परिवार - ओळख

लेखक अडाणि यांनी गुरुवार, 12/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आपणास 'ह्रदय-ज्योत परिवार' ह्या न्यासाची (ट्रस्ट) ओळख करून देवू इच्छितो. ह्रदय्-ज्योत परिवार हा गेली ५ वर्षे जन्मजात असलेल्या ह्रदयदोषासंबंधी काम करतो. आपल्याकडे बर्‍याचवेळा योग्य माहिती अभावी वेळेवर उपचार होत नाहित. दोषाचे निदान झाले तर उपचारांचा खर्च परवडत नसतो किंव्वा पैसे कसे जमा करवेत ह्याची माहिती नसते. अजूनही बर्‍याच लोकांना ह्रदयरोग आणि ह्रदयदोष ह्यातील फरक माहिती नसतो. ह्या सर्व बाबींच्या अनुशंगाने न्यास काम करतो.

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/03/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

आणि म्हणे मी लिंबूटिंबू!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 09/03/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी!!! आज तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. मी बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणत होतो पण आमच्या त्या खड्डूस मालकांनी (म्हणजे मालक आमचे, तुमचे पिडांकाका!!!!:)) कधी संधीच मिळू दिली नाही. "तू अजून पुरता तयार झाला नाहियेस" हे त्यांचं पालुपद!! तेंव्हा आत्ता कुठे तुमच्याशी जरा बोलायची मोकळीक मिळाल्येय, तिचा फायदा घेतोय!!! "अरे पण तू कोण, कुठला, ते तरी सांग मिपाकरांना!", डांबिसकाका "म्हणजे? त्यांना अजुन काही पत्ताच नाही?" "पत्ता कसा असेल? अरे तू म्हणजे काय "अनुष्का" आहेस का की मिपावरच्या समस्त सभासदांना तुझी समग्र माहिती!!!

तिच्या नजरेतून...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 08/03/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

जाधव सर

लेखक प्रमेय यांनी शनिवार, 07/03/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’. माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले.