Skip to main content

जीवनमान

आंतरराष्ट्रीय बीयर दिवस

लेखक सुनील यांनी बुधवार, 05/08/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरराष्ट्रीय बीयर दिवस आहे, हे मिपाकरांच्या ध्यानात आलेले दिसत नाही! असो, सध्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नाही, परंतु सविस्तर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे!!

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

कोप

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 31/07/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पोरास्नी म्हागं सोडुन गेली वो सायेब? आता पोरास्नी कसं सांगु? माजं तर समदं आविष्यच बरबाद झालं बगा !! तो धाय मोकलुन रडत होता. आणि आम्ही सारे हतबुद्ध होवुन पाहात होतो. तीचं शव तिथंच पडुन होतं आणि काल रात्रीपासुन हा सहावा माणुस होता तीला आपली बायको म्हणणारा ! मनोमन प्रचंड संताप येत होता. केवळ दागिन्यांसाठी माणुस या थराला जावु शकतो. काल रात्री आणखी एक ढासळलेले घर शोधताना एका महिलेचे शव सापडले होते. दागिन्यांनी बाई नखशिखांत सजलेली होती. आणि तिच्यावर हक्क सांगायला आत्तापर्यंत सहा जण आले होते. नाही, ही कुठल्याही रहस्यकथेची किंवा खुनप्रकरणाची सुरुवात नाहीये.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

तुर डाळ

लेखक पर्नल नेने मराठे यांनी मंगळवार, 28/07/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले. :S आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा :-? चुचु

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

मुंबईच्या किनार्‍यावर लाटांचे आक्रमण

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 24/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या किनार्‍यावर धडकणार्‍या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही.