Skip to main content

जीवनमान

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

लेखक Trump यांनी रविवार, 15/05/2022 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.

मी, मराठी आणि माझं मराठी असणं

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 01/05/2022 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
हो. मी मराठी आहे. म्हणजे नक्की कोण आहे? आणि मला मराठी का म्हणायचं? दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली एक राजसि भाषा बोलतो, वाचतो, लिहितो म्हणून? की अपरांतापासून ते विदर्भापर्यंत आणि सातपुड्यापासून करवीरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात राहतो म्हणून? पोहे, मोदक, पुरणपोळी, पिठलं, शिरा खातो म्हणून की घरी गणपती बसवतो, गुढी उभारतो, भंडारा उधळतो म्हणून? पृथ्वी, अग्नि, जल, वायु आणि आकाश ह्या पंचतत्वांनी सर्व चराचर सृष्टी बनली आहे, तसाच मी ही. पण तो "मी" म्हणजे फक्त माझं शरीर झालं. मी आज जो काही आहे त्या "मी" ला घडवण्याचं काम गेली शेकडो, कदाचित हजारो वर्षं चालू आहे.

एकटेपणा- सत्य कथा

लेखक मार्गी यांनी बुधवार, 13/04/2022 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का. किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल. आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही.

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 28/03/2022 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे.

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

लेखक मार्गी यांनी रविवार, 20/03/2022 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!! नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं. कधी ट्रेकिंग, कधी फिरण्यासाठी तर कधी मदत कार्यासाठी कश्मीरला प्रवास झाले.

शान्तिपुर्ण अपमृत्यु

लेखक शेर भाई यांनी शनिवार, 12/03/2022 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
ये उन दिनो कि बात है, जेव्हा नुकतच मिसरूड फुटायला लागली होती. विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचे दिवस सुरु झाले होते. सक्काळी उठून पहिले लेक्चर गाठणे आणि मग इतर महाविद्यालयिन कर्तव्ये आटपून जेव्हा मी आमच्या स्थानिक गोतावाळ्यासह स्टेशनच्या बस डेपोला यायचो तेव्हा दुपारच्या अधिवेशानातल्या मैना - बकुळांची हि भलीमोठी गर्दी आमच्या सोबतीला असे. (आमच्याकडे त्या काळापासून फक्त महिलांचे असे एक महाविद्यालय आहे.) त्या भर गर्दीत देखील आपली आवडती खिडकी मिळत नाही तो पर्यंत येणारी बस सोडायची चंगळ आम्ही करत असू. कोणालाही खर वाटणार नाही पण बेस्टची “झिरो वेटिंग बस सेवा” हा प्रकार आमची मदत करायचा.

नकोच ते युद्ध नको

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 02/03/2022 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

सोशल नेटवर्क

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 20/02/2022 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
"So are you Indian?" स्पेनच्या उत्तर पश्चिम टोकाला असणार्‍या A Coruña ह्या छोट्याशा शहरातल्या Take Away काउंटर पलिकडे Soledad नावाचा बॅज लावलेल्या त्या मुलीने माझ्या चेहर्‍याकडे बघून मी भारतीय आहे हे ओळखलं ह्यात काय कौतुक? ह्यांना प्रत्येक brown माणूस भारतीय वाटणारच. "Yes Soledad, I am." "व्हॉत पार्त ऑफ इंदिया?" "आय अ‍ॅम फ्रॉम अ सिटी कॉल्ड पूने." (माझा "पूने" उच्चार प्रश्नार्थक असतो) ओSSSह पु"णे"??? (मी चाट!). "एम जी रोड? कोरेगांव पार्क?? दागडूशेट गानापती बाप्पा मोरया!!!" "सो यू'व बीन टू पुणे?" (माझे उच्चार सुधारले!) "येSSस...थ्री मोंथ्स...ब्यूतिफुल प्लेस...

हेमंत ऋतू!

लेखक Bhakti यांनी रविवार, 20/02/2022 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सव ग्रीष्मोत्सव वर्षा शरदोत्सव हेमंत ऋतू हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं. थंडी ही हेमंत आणि शिशिर या ऋतूत विभागली आहे. या दोन ऋतुंमध्ये फारसा फरक करायचा तर तापमानावरून करता येईल. तरीही काही ठिकाणी याचा उल्लेख प्री-विंटर असा आहे.