स्टेपनीची गरज
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की.
स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.
मिसळपाव
माझे माहेर पुण्याचे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती आणि उभ्याच्या गौरी असतात. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. आमचे कुटुंब खूप मोठे होते. घरात माझे वडील थोरले. त्यांच्या पाठोपाठ ४ काका आणि एक आत्या.