मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कामवाल्या बाई आणि आय. टी.

Pearl · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजकाल बर्‍याचदा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात. अशा वेळी घरातले काम, साफसफाई, धुणीभांडी, स्वयंपाक, मुलांच्याबरोबर वेळ घालविणे, गप्पा मारणे, पेपर वाचणे अशा कितीतरी गोष्टी रोजच्या रोज करायच्या असतात. पण सगळी कामं काही स्वतः घरी करणे शक्य नसते. मग आपण काय करतो तर, जी काही रटाळ, कंटाळवाणी, non-value addition वाली कामं असतात, ज्या कामासाठी खूप expertise लागत नाही, ज्यात थोडंफार इकडं तिकडं झालेलं चालतं ती कामं आपण outsource करतो. I mean त्या कामांसाठी आपण कामवाल्या बाई लावतो. आणि आपला वेळ वाचवून तो आपल्याला आवडणारी कामं करण्यातं किंवा आवडीच्या गोष्टी करण्यात / छंद जोपासण्यात कारणी लावतो. कधी कधी वाटतं की या धुणीभांडी करणार्‍या बायकांना कंटाळा येत नसेल का रोज रोज तेच तेच रटाळ काम करून किंवा लोकांची उष्टी-खरकटी काढून. त्यांना वाटतं नसेल का आपण यापेक्षा थोडं चांगलं, वरच्या लेव्हलचं काम करावं. कधीकधी कंटाळा येतही असेल. पण त्यांच्यापुढे काही पर्याय नसेल किंवा त्यांना ते काम करणं सवयीनं आवडतंही असेल किंवा सवयीनं त्याचा कंटाळा येत नसेल. रोजच तेच रटाळ काम करूनही ही मंडळी छान खूष असतात. ----------------------------------------------------------------------------------------- आणि आय.टी वाले आपणही ओफिसात तेच करतो. युरोपीयन/अमेरिकन लोकांची (किंवा युरोपीयन/अमेरिकन उद्योगधंद्यांची) स्वस्तात धुणीभांडी/केरफरशी करून देतो. so that त्यांना त्यांचा वेळ Quality time म्हणून वापरता यावा महत्वाच्या गोष्टींसाठी. आणि केरफरशी मध्ये त्यांचा वेळ फालतू वाया जाउ नये :-) आणि तीच आपली रोजीरोटी आहे. आपण त्यातच खूष आहे. नुसतचं खूष काय आपण तर आय टी च्या ऐटीतच आहोत. ----------------------------------------------------------------------------------------- टीपः ह्या लेखात गंमत म्हणून घरकाम व्यवसाय आणी भारतातील आय टी business या दोन व्यवसायांची comparison केली आहे. त्यात कुठेही घरकाम करणे हीन दर्जाचे वगैरे असे मत नाही किंवा कामवाल्या बाईंना कमी लेखणे असा कोणताही उद्देश नाही. इतकचं वाटतं की भारतात एवढं उच्च दर्जांचे मेंदू मुबलक असताना त्याचा वापर फक्त service industry तले स्वस्त मजूर म्हणून न होता त्यांच्या बुद्धिमत्तेचा जास्त चांगला वापर व्हावा आणि मुख्य म्हणजे भारतालाही प्रगत मेंदूचा आणि प्रगत software technology चा उपयोग व्हावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही. अनावधानाने तसे झाले असल्यास क्षमस्व. ----------------------------------------------------------------------------------------- अशा प्रकारचा लेख पहिल्यांदाच लिहित असल्याने चूकभूल देणे घेणे.

वाचने 7189 वाचनखूण प्रतिक्रिया 27

चिरोटा Wed, 02/09/2011 - 11:38
सहमत आहे. कालच्या नॅस्कॉम मिटिंग मध्ये आय्.टी.मंत्री आदरणिय कपिल सिबलही म्हणाले- "So far we have been looking at this industry only interms of how much tax and revenue we can get. But we need tolook at this industry as to how much it can empower thepeople," Sibal said http://news.oneindia.in/2011/02/08/stoplooking-at-it-industry-as-a-cash-cowsibal-aid0126.html

असहकार Wed, 02/09/2011 - 12:07
आपण आता हळू हळू value chain(मूल्य उतरंड) मध्ये वरती जात आहोत. गावाकडून शहराकडे( ५० - ७० चा कालखंड), क्लार्क त मेनेजर (७० -९० चा कालखंड ), आणी आता परदेशात,,,,, अल्प संतुष्टीची संकल्पना आता शिकरणावरुन बर्गरवर आली आहे , ( बदल आहे पण हळू हळू)

रमताराम Wed, 02/09/2011 - 12:01
सफाईची (पक्षी: कोड मेंटेनन्सची) कामे करून महासत्ता होता येते यावर माझा विश्वास नाही. तीन चार लहान मोठ्या आय टी कंपन्यांच्या क्लायंटस् शी बोलल्यानंतर माझा समज असा झालेला आहे की गुणवत्तेवर आधारित - ज्याला खर्‍या अर्थाने क्रिएटिव म्हणता येईल - असे काम घेण्यास स्थानिक कंपन्या नाखूष असतात. आयटी कंपन्या या साधारणपणे ठेकेदार असतात. पुण्यात दांडेकर पुलाजवळ जसे मजुरांचे जथे घेऊन ठेकेदार बसतो (अन्य शहरातील लोकांनी आपापल्या शहरातील मजूर अड्डा शोधावा) नि आलेल्या 'गिर्‍हाइकाला' मागणीप्रमाणे ट्रक भरून मजूर देतो तसे काहीसे स्वरूप आहे. अगदी गिर्‍हाईकाला हवा तसा कामगार आपल्याकडे नसेल तर एखाद्या कामगाराचा सीवी 'टॉप्-अप' करून पाठवणे वगैरे प्रकारही चालतात. धंदा करताना मिळणारा पैसा हाच महत्त्वाचा. मग मागणी तसा पुरवठा हेच ब्रीदवाक्य. आम्ही बारा वर्षे ज्या कंपनी काम केले तिथे व्हीसी इन्वेस्टमेंट झाल्यावर बदलेली परिस्थिती पाहून तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तो याच कारणाने आता 'स्पर्धेतून श्रेष्ठ तेच बाहेर येईल' हे स्पर्धेच्या युगाचे गृहितक स्वप्नाळूपणे सांभाळणार्‍यांच्या समजुतीला किमान छेद तरी जातो. गंमत म्हणजे हे पाहताना कम्युनिस्ट - मी कम्युनिजम म्हणत नाही, प्लीज नोट - चलतीच्या काळात 'भावी वर्गविहीन समाजात सारे आलबेल असेल' असा जो समज पसरवण्यात आला होता त्याच्याशी तुलना करण्याचा मोह टाळता येत नाही. एकुण काय कोणत्याही तत्त्वज्ञानाचा झेंडा -नुसता झेंडाच- खांद्यावर असो, मध्ययुगीन स्वप्नाळूपणा काही दूर होत नाही. अर्थात गुणवत्तेवर आधारित क्रिएटिव कामे घेणे कंपन्यांना परवडणार नाही. पहिले म्हणजे यात वॉल्युम वर्क कमी असेल (त्यामुळे पैसा कमी) आणि जे स्किलसेट लागतील ते मोजक्याच उमेदवारांकडे असल्याने एकतर त्यांच्या तंत्राने वागावे लागेल (ज्यामुळे पुन्हा प्रॉफिट मार्जिन कमी होईल) आणि पुन्हा चालू प्रॉजेक्टच्या अधेमधे त्याने कंपनी सोडली तर ऐनवेळी त्याच्या जागी दुसरा माणूस उभे करणे जवळजवळ अशक्य होउन बसते.

In reply to by रमताराम

वपाडाव Wed, 02/09/2011 - 12:22
पुन्हा चालू प्रॉजेक्टच्या अधेमधे त्याने कंपनी सोडली तर ऐनवेळी त्याच्या जागी दुसरा माणूस उभे करणे जवळजवळ अशक्य होउन बसते.
अग्दी सहमत.....

५० फक्त Wed, 02/09/2011 - 12:23
"कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही. अनावधानाने तसे झाले असल्यास क्षमस्व." पर्ल, हे लिहिण्याची काही गरज नव्हती. ज्यांच्या भावना दुखावण्याएवढ्या जाग्रुत असतील त्यांनी धुण्या भांड्याची कामे करुच नयेत. आणि अशिक्षित मजुर ते अतिशिक्षित आयटि मजुर यांच्यात काही फरक नाहि, एक जण देशी पिउन बायकोशी भांडतो, दुसरा व्होडका पिउन गर्लफ्रेंड्शी. दोघेही आपलं राहतं गाव सोडुन दुर देशी येतात मजुरी हुडकायला , एक जण ट्रक, रेल्वेनं दुसरा विमानानं, फक्त फरक आहे तो पैशांचा बाकी काही नाही. जसा आमच्याकडे इमारत पुर्ण झाली की मजुरांना आत येता पण येत नाही, राहणं तर दुर आहे तसंच आयटित पण आहे. निदान धुणे भांडॅ करणा-यांना आपण कुणाकडे काम करतो आहे, त्यांनी काय केलं होतं काय नाही ते कळतं तरी, पण आयटित ते पण कळणार नाही याची खबरदारी कामावर ठेवणारा घेत असतो. बाकी जाणकार प्रकाश टाकतील.

In reply to by ५० फक्त

धमाल मुलगा Wed, 02/09/2011 - 14:55
हर्षदआण्णांनी केलेली तुलना देखील येकदम परफेक्ट :) आपण तर साला कोणी विचारलं की काय करतोस, तर नेहमी एकच उत्तर देतो, "मी आय.टी.हमाल आहे." विषय संपला. ;)

टीपः ह्या लेखात गंमत म्हणून घरकाम व्यवसाय आणी भारतातील आय टी business या दोन व्यवसायांची comparison केली आहे.
आता ह्या धाग्यावर खूप गंभीर चर्चा होईल अशी अपेक्षा ठेवु नये.
इतकचं वाटतं की भारतात एवढं उच्च दर्जांचे मेंदू मुबलक असताना त्याचा वापर फक्त service industry तले स्वस्त मजूर म्हणून न होता त्यांच्या बुद्धिमत्तेचा जास्त चांगला वापर व्हावा आणि मुख्य म्हणजे भारतालाही प्रगत मेंदूचा आणि प्रगत software technology चा उपयोग व्हावा.
उच्च दर्जाचे किती मेंदू service industry मध्ये कार्यरत आहेत ह्याचा काही विदा मिळेल काय ? अथवा आपण अभ्यासला आहेत काय?

पिंगू Wed, 02/09/2011 - 15:02
सहमत आहे.. सध्यातरी भारतीय आयटीवाले धुण्याभांड्यांचीच कामे करत आहेत. त्यातील खूपच कमी मंडळी जरा वरच्या गादीवर पोचली आहेत.. हा आमचा वैयक्तिक अनुभव असल्याने सर्वेचा विदा उपलब्ध नाही.. - (रेडहॅटमध्ये भांडी घासणारा) पिंगू

शाहरुख Wed, 02/09/2011 - 23:01
आय. टी. इंडस्ट्री ही "आय.टी. इंडस्ट्री" कशासाठी ? जगातील कुठलीही आणि कसलीही सर्व्हिस इंडस्ट्री घेतली तरी गिर्‍हाईकाला "कस्टमर फर्स्ट" म्हणत ** बनवणे या तत्वावरच ती इंडस्ट्री फळफळते.. बाकी 'उच्च दर्जांचे मेंदू' वगैरे बद्दल जाणकारांची मतं वाचतोयंच !

अर्धवटराव गुरुवार, 02/10/2011 - 04:39
ज्याला खरंखुरं अभियांत्रीकी/संशोधन म्हणता येईल अशी कामं करणार्‍यांची संख्या कमी आहे खरी. आपली शिक्षण पद्धती, इतर क्षेत्रांतल्या संधींचा अभाव, डॉलर-->रुपया चा दर, माहिती तंत्रज्ञानाधारीत/पोषक व्यवसायांचा भारताच्या एकुण अर्थविश्वातील कमी टक्का... कारणं अनेक असतील. पण सर्वसामान्य बुद्धीमत्तेच्या व्यक्तीला बर्‍यापैकी पैसे मिळवुन देणारं हे माध्यम हमालीपेक्षा/साफसफाईच्या कामापेक्षा किंचीत बरं आहे असं वाटतं. हमालाला त्याच्या पाठीवर, डोक्यावर कुठल्या मालाचं, कोण्या व्यक्तीचं ओझं आहे याच्याशी काहि घेणं देणं नसतं. त्या गोणीचे मुल्य त्याच्या खिजगिणतीत नसते. साफसफाई करणार्‍याला आपल्या झाडुखाली काय येतय याची पर्वा नसते. जमवलेला केर-कचरा कचरापेटीत टाकला कि हा चहा घ्यायला मोकळा. आय.टी. मध्ये मात्र आपण जे काम करतोय त्याचा ग्राहक कोण, त्याची बिझनेस व्हेल्यु काय, पुढील ट्रेंड कसा असेल याबद्दलची जागृती मी बर्‍याच लोकांमध्ये बघितली आहे. बर्‍याच जणांना (५०% ??) कधितरी हा बिझनेस आपण स्वतः करु अशी प्रबळ इच्छा होते. काहि थोडे त्यात यशस्वी देखील होतात. थोडक्यात काय, तर "ज्ञान (किंवा माहिती) हि एक शक्ती आहे आणि ती आपल्या उपयोगा करता/उन्नती करता वापरल्या जाउ शकते" हा किडा भारतीयांच्या डोक्यात बर्‍यापैकी वळवळायला लागलाय. अर्धवटराव

५० फक्त गुरुवार, 02/10/2011 - 08:28
@ शाहरुख, "आय. टी. इंडस्ट्री ही "आय.टी. इंडस्ट्री" कशासाठी " आयटि इंडस्ट्री हे सरकारकडुन स्वस्तात जमिनी ब़ळकावण्यासाठी सर्व सामान्यांच्या डोळ्यांत केलेली धु़ळफेक आहे. थोडी वाट पहा, येत्या दोन - तिन वर्षात या प्रकारची लफडी सुद्धा बाहेर पडतीलच. सरकारच्या तथाकथित ऑद्यगिक विकास महामंडळांच्या कडुन सरकारी भावानं जो निश्चितच बाजारभावापेक्षा प्रचंड कमी असतो त्या भावानं जमिनी ९९ ते ९९९ वर्षांच्या करारानं घ्यायच्या. मग आपली कंपनी १०-२० वर्षे चालवायची आणि नंतर एक फुटकळ अर्ज करुन मु़ळ वापर करारात बदल करुन त्याच जमिनिवर हॉटेल किंवा इतर कमर्शियल धंदे करायला सुरुवात करायचे, हा लाँग टर्मचा प्लॅन असतो. आज अशा २-३ कंपन्या माहित आहेत ज्यांनी पुण्याजवळच्या अशा सरकारी जागा स्वस्तात लिजवर घेउन, दुस-याच मोठ्या कंपनीला बाज्रारभावानं भाड्याने दिल्या आहेत आणि मुळ कंपन्या फक्त कागदोपत्रिच चालु आहेत.

In reply to by ५० फक्त

शाहरुख गुरुवार, 02/10/2011 - 19:51
धाग्याचा विषय नाहीय खरा पण..
आयटि इंडस्ट्री हे सरकारकडुन स्वस्तात जमिनी ब़ळकावण्यासाठी सर्व सामान्यांच्या डोळ्यांत केलेली धु़ळफेक आहे.
पुर्वी एम. आय. डी. सी. मधे धंद्याचे खोटे प्रस्ताव देऊन जागा बळकवल्या जायच्या, अश्या स्टोर्‍या ऐकल्या आहेत.
सरकारच्या तथाकथित ऑद्यगिक विकास महामंडळांच्या कडुन सरकारी भावानं जो निश्चितच बाजारभावापेक्षा प्रचंड कमी असतो त्या भावानं जमिनी ९९ ते ९९९ वर्षांच्या करारानं घ्यायच्या. मग आपली कंपनी १०-२० वर्षे चालवायची आणि नंतर एक फुटकळ अर्ज करुन मु़ळ वापर करारात बदल करुन त्याच जमिनिवर हॉटेल किंवा इतर कमर्शियल धंदे करायला सुरुवात करायचे, हा लाँग टर्मचा प्लॅन असतो
मुंबईतील कापड गिरण्या ? बाकी सरकारचा करार काय असतो माहित नसल्याने काही बोलू शकत नाही. मध्यंतरी इन्फोसिसने मिळालेल्या जागेचा सढळ वापर केल्याबद्दल, म्हणजे सरकार कडून स्वस्तात जमिन घेऊन कॅम्पसमधे धबधबे आणि कारंजे वगैरे केल्याबद्दल, काहीतरी वाद सुरु झाला होता..कुणाकडे काही माहिती आहे का?

कलंत्री गुरुवार, 02/10/2011 - 11:30
या दोन वर्गातील दरी कमी करावयाचा प्रयत्न करायला हवा. ( कोण करील ते ठाऊक नाही). एक मात्र नक्की, ज्या पद्धतीने मागच्या ५० वर्षत ग्रामीण भागातील लोकं शहरात विस्थापित झाले त्याच प्रमाणे आयटी मधील लोकं / त्यांची मुले आणि मुली या पुढच्या ५० वर्षात लंडन, न्युयार्क आणि इतर शहरात जातील. मोलमजूरी करणार्‍यांचे काय होईल ते मात्र सांगता येत नाही.

In reply to by कलंत्री

पंगा Fri, 02/11/2011 - 07:55
या दोन वर्गातील दरी कमी करावयाचा प्रयत्न करायला हवा.
('हे दोन वर्ग' म्हणजे कामवाल्या बाई आणि आय.टी.वाले असावेत, या समजुतीखाली हा प्रतिसाद लिहीत आहे. चूभूद्याघ्या.) या दोन वर्गांतील दरी कमी करण्याचा एक हमखास मार्ग आहे. तो म्हणजे, आंतरवर्गीय विवाह. एकदा का समस्त आय.टी.पुरुषांची मोलकरणींशी आणि समस्त आयटीस्त्रियांची रामागड्यांशी लग्ने लावून दिली, की काम फत्ते झालेच म्हणून समजा! एकदा का किमान दोन वर्गांतली अठरापगड माणसे एकाच छपराखाली गुण्यागोविंदाने राहू लागली, की मग ती वर्गांतली दरी कमीच काय, आंतरवर्गीय सामंजस्यसुद्धा निर्माण होईल, आणि सर्व 'संबंधितां'च्या मनांतून वर्गभेद आपोआप आणि ताबडतोब विसरला जाऊन वर्गविरहित समाजाचे स्वप्न लगेच साकार होईल. समाजातील लैंगिक भेदभाव समूळ नष्ट करण्याच्या बाबतीत आंतरलैंगिक विवाहांचे आणि समाजातील जातिभेदाचे, जातीय अस्मितांचे आणि मुख्य म्हणजे जातिविषयक जाणिवांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यामागील आंतरजातीय विवाहांचे घवघवीत यश लक्षात घेऊनच अत्यंत गांभीर्यपूर्वक हा प्रस्ताव मांडलेला आहे. धन्यवाद.

In reply to by पंगा

आजानुकर्ण Fri, 02/11/2011 - 10:56
अशा विवाहांमुळे घरकाम कोणी करायचे वगैरे प्रश्नही उद्भवणार नाहीत व विश्वशांतीला हातभार लागेल हा वेगळाच फायदा.