सुचना:लेखामधे नाईलाजाने काही अपशब्द टाकावे लागलेत्,लेख स्वःताच्या जबाबदारीवर वाचावा.
"भे**** पुरता फसलोय रे!" मी ग्लास टॉप टु बॉटम उतरवुन बोललो.
"का? आता काय झाल? साला बघावं तेव्हा रडत असतो" एका जीवलग सख्याने विचारले.
"साला माझ्याबरोबर तस झालय ना!तुम्हाला काय घंटा माहीतेय?"
"मग सांग ना,मी तुला सांगेन मार्ग्,मला गुरु समज" खुर्च्या उबवुन व दारु ढोसुन ढोल बनलेला तोच मित्र म्हणाला.
"हो बोल काय झालय तरी काय" अजुन एक 'काका' टाईप ग्रुहस्थ म्हणाले.
आता जरा पिउन बोलायला स्कोप होता म्हणुन सुरु झालो.
"हे बघ्,मला दोन व्यक्ती नाही बनायचे.'ए' व 'बी' समज.मी दोन्ही बनु शकतो.पण मला एकच बनायचे आहे.जर मी ए बनुन चाललो तर मधेच अशी वेळ येते की मला बी बनावे लागते.जर बी मी नाही बनलो तर वाटते की मी ए बनुन खुश नाही राहु शकत.व फक्त बी बनलो तर मला प्रगती
नाही.मी डीसाईड नाही करु शकत की एकाच वेळी ए बनले पाहीजे की बी बनले पाहीजे."
काकांनी हीम्मत सोडली नाही,पण दुसरा मित्र वैतागला.
"एक मिनीट थांब्,च्यायला तु पागल झालायस काय रे? जा लग्न कर!!"
"काय सारखं लग्न लग्न लग्न,च्या** *** लग्न हे एकच सोल्युशन आहे का?" मी.
मधेच काका म्हणाले " ए कींवा बी ना? माझं ऐकशील?
मी : हो बोला ना,त्यासाठीच तर तुम्हाला विचारलेय.
काका: ए कींवा बी काहीच बनु नकोस.
मी: हत्त्त तिच्यायला!.......अरे सॉरी बोला.
काका:जास्त विचार करु नकोस,मनावर ताबा ठेव व गरजेनुसार वाग.
अनुभवाचे बोल थोडेफार पटले.पण ए कींवा बी काहीच नाही मग बनु तर काय? हा प्रश्न मी टाळला काकांची सहनशक्ती संपायला आली होती.
मी:आता काहीतरी वाचायचे म्हणतोय.
मित्र(चवताळुन): काय काय्,काय वाचणार आहेस सांग.
मी: मी बायबल वाचलेय्,माझ्या मोबाईलमधे आहे,कुरान आहे व गुरु ग्रंथ साहीब आज टाकेन.
मित्रः अरे गप्प बस चु* साला! मराठी ना तु?
मी:गीता डोक्यात जात नाही म्हणुन नाही वाचत.तु सांग ना मग अजुन काय वाचु? साले विरोध करायला सर्व पुढे असतात.तु सांग आता!
मित्रःहनुमान चालिसा वाचलियेस?
मी:नाही.
काका व तो मित्र एकदमः तर्रीच्च!!!
माझी अर्धी नशा उतरली 'एवढे काय आहे त्यात?',दोघांनी 'हनुमान चालिसा'ला जोरदार पाठींबा दीला होता.
मी:वाचेन उद्या वाचेन.
मित्रःआधी वाचली असतीस तर अशी मारामारी करुन आला नसतास.
मित्र कालची एक घटना आठवुन बोलला.
मी:अरे मी काय केल? झालं ते.
मित्रःहो ना,तु काय करतोस? दारु पण आपोआप ग्लासातुन तुझ्या पोटात जाते ना! तु कुठे दारु पितोयस!
मी(मनात):**+#)! #-@*+-#).
काका: थांब रे ते सोड.गरुड पुराण वाचलयस?
मी:नाही,काय आहे ते?
काका: मरणानंतर काय? आधी काय? सर्व आहे त्यात.वाचच! पुन्हा प्रश्न नाही विचारणार तु कधी!
मी: नक्की काय वाचु? हनुमान चालीसा की गरुड पुराण?
मित्रःहनुमान चालिसा.
काका:गरुड् पुराण.
मला उठुन दोघांच्या एक कानफाडीत वाजवावशी वाटली.साले कन्फ्युजनवर कन्फ्युजन वाढवत होते.
मी:वाचेन दोन्ही वाचेन.
नशा खुप झाली होती,मी आटोपते घेतले.घरातुन ४ मिस्ड कॉल आले होते.म्हणुन घरचा नंबर लावला.
पुढुन आवाज आला "हा सर्,आज दोन डील झाल्या.त्या शेअर्सबद्दल विचारायचे आहे का?"
मी:हत्त तिच्याआयला कुठे रे नंबर लागला?
फोन कट केला,पुढे चर्चा करुन फायदा नव्हता.
काका व मित्राला "चुकीचे बोललो असेन तर माफ करा" वगैरे सर्व बोलुन निरोप घेतला.
घरी आलो.गुरु ग्रंथ साहीब वाचायला लागलो.
याद्या
2450
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन
काहीही बना हो,की फर्क पैंदा
ये दारु साला चीज ही ऐसी
अरेरे श्यीईईईईई!!!