Skip to main content

जीवनमान

देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 05/11/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला. महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!!

लेडीज स्पेशल ट्रेन-एक सर्व्हे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
विनिता देशपांडे यांचा लेख वाचून मला काही दिवसांपुर्वीची आठवण झाली.. आम्ही काही जणींनी मिळुन संध्याकाळी सी एस टी हून सुटणार्‍या लेडीज स्पेशल ट्रेन मधे सहज एक प्रश्णावली दिली होती, अनेक जणीनी उत्तर दिलीच, शिवाय अशिक्षित बायकाना ही विचारून त्यांच्या वतीने उत्तरे भरली.. एक खूप छान अनुभव होता, पण निष्कर्ष तेवढा छान नव्हता..आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्या उत्तरात अनेक समान गोष्टी होत्या..अर्थात, यात काही सिध्द करणे वा रडगाणे गाणे वा खाजगी गोष्टीत नाक खुपसणे हा उद्देश नव्हता. जरा, सगळ्यांना व्यक्त होण्याची सन्धी देणे आणि मैत्री करणे ,हे अपेक्षित होतं.

ती

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 03/11/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला. "हॅलो, कोण बोलतंय?...." ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही. "हॅलो... बाबा.... आहेत का?" मी चाचरत विचारले. "ह्हो..." पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज."बाबा, तुझा फोन आहे." मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले.

'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 02/11/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली.

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

लेखक प्रास यांनी बुधवार, 02/11/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं.

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे !
काव्यरस

सात अब्ज

लेखक विकास यांनी बुधवार, 02/11/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
१८०० च्या दशकात जगाची लोकसंख्या प्रथमच एक अब्जापर्यंत पोचली. १९२७ साली म्हणजे उण्यापुर्‍या शतका मधे ती दुप्पट अर्थात २ अब्ज झाली, साधारण सत्तर वर्षात, १९९८ साली ती सहा अब्ज इतकी झाली तर केवळ १३ वर्षांमध्ये ती आता ७ अब्ज इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या औपचारीक अंदाजाप्रमाणे कालच्या एकतीस ऑटोबरला जागतीक लोकसंख्या ही ७ अब्ज झाली! पण अमेरीकन लोकसंख्या मोजणी आयोगाप्रमाणे सात बिलीयन्स होण्यासाठी अजून चार-पाच महीन्यांचा अवधी आहे.

रस्सा.. मराठमोळी मेजवानी !!

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 31/10/2011 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
गविंनी खादाडी पोस्टचा सपाटा लावल्याने, त्यात अजुन एक भर.... ;) मुंबई पश्चिम उपनगरात मराठमोळी खाण्याची ठिकाणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच... त्यात आणखी एक भर म्हणजे हे हॉटेल. पाच तरुण मराठी मुलांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. हॉटेलचं नाव हे या पाच मुलांच्या नावाच्या आद्याक्षारांपासून बनले आहे.... रस्सा...!! मराठमोळी मेजवानी चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे.. PF ऑफिसच्या बाजूला हे छोटेखानी हॉटेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी, असं दोन्ही प्रकारचं उत्तम जेवण इथे मिळतं. चिकन थाळी, सुरमई थाळी, वांग्याचे भरीत, झुणका निव्वळ अफलातून... इथे पदार्थांचे खूप कमी फोटो दिले आहेत...

खदान !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 31/10/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रसौजन्य : गवी पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : पोस्टमार्टेम रिपोर्ट व कथानायकाशी असलेली ओळख यावर आधारित,थोडासा,कल्पना-विस्तार केला आहे. अर्थात, कथानायकाने घेतलेल्या निर्णयाशी लेखक प्रचंड असहमत आहे. प्रचंड धाप लागलेल्या अवस्थेत, तो रडत-खडत, कसाबसा, पाण्याबाहेर आला, अंगातील कपडे शरीराला घट्ट चिकटले होते. चालताना सैल होणार्‍या पॅन्टच्या बॉटममधुन पाणी गळत होते, मुरुममिश्रीत मातीत वाहणार्‍या पाण्यामुळे त्याच्या बुटांचा " छपाक-छपाक " असा आवाज येत होता.