Skip to main content

जीवनमान

आली आली हो दिवाळी-

लेखक विदेश यांनी रविवार, 23/10/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली हो दिवाळी सांगे दारी ही रांगोळी स्वागतास सज्ज राहू प्रकाशात घरोघरी ! सुसंवादी भेटीत त्या काव्य शास्त्र विनोदाच्या - एकमेकांना देऊ या शुभकामना मनीच्या ! करू विना आवाजाने छान दिवाळी साजरी , ठेवू प्रदूषणमुक्त वसुंधरा ही गोजिरी ! गोडधोड चवदार खमंगशा फराळात- भूक गोरगरीबांची नित्य घेऊया ध्यानांत !

दोन प्रसंग

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 21/10/2011 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १: स्थळ: एका हाफिसातील क्यांटिन कर्मचारी१: काय रे कशी होती तुझी दिल्ली व्हिजिट? कर्मचारी२: अरे मस्त! फ्यामिलीला घेऊन गेलो होतो. काम फक्त २ दिवस होतं. बाकी २ दिवस दिल्ली त भटकलो क१: वा! आता मेट्रोमुळे भटकणं सोपंही झालंय नाही क२: हो यार! बर्‍याच वर्षांपूर्वी स्वतःच वाहन नसल्याने तिथल्या रिक्षावाल्यांना इतके पैसे दिले होते की त्यात नवी रिक्षा आली असती दोघे: हा हा हा क१: अरे त्या ट्रीपचा वेगळा अलाऊंस असतो ना? क२: हो तर म्हणून तर जातो.

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

काही नोंदी अशातशाच... - ८

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 18/10/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
या नोंदी लिहायच्या की नाही, असा प्रश्न माझा मलाच पडला. या विषयावर याआधी दोन-तीनदा लेखन झालं आहेच. त्यातली मूळची तथ्यं नवी नाहीत. मग का लिहायचं? प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर 'नको' असंच होतं. पण एक चाळा म्हणून या दोन दिवसांच्या अनुभवांकडे पाहिलं. थोडं तटस्थपणे. तेव्हा असं लक्षात आलं की, काही गोष्टी आपल्याच संचितात नव्यानं जमा झालेल्या आहेत. त्यांची कुठं तरी नोंद झाली पाहिजे. मग हेही लक्षात आलं की, काही वाचकांना तरी खचितच काही गोष्टी नव्यानं कळतील. लिहायचं, हे ठरलं. हे मनोगत नाही, किंवा स्पष्टीकरणही नाही.

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.