Skip to main content

जीवनमान

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

लेखक विदेश यांनी रविवार, 20/11/2011 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे) अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ|| रंगविले गॅरेजात कितिक देखणे आवडले गाडीला खूप खर्चणे स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१| हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२| ...पाहु दे असेच तिला आता गंजता राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

जीवन

लेखक दि ग्रेट मराठा यांनी शुक्रवार, 18/11/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चालणारे दोन पाय किती विसंगत। एक मागे असतो, एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो,मागच्याला अपमान नसतो। कारण त्यांना ठाऊक असत, क्षणात हे बदलणारं असतं। याचंच नाव जीवन असतं..!!

सी- सॅट..!!

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 16/11/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये "सी- सॅट" आणि "डी- सॅट" हे नेहमीच्या वापरातले शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर, "डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )" आणि "सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)" प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते. जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं.

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

बिगारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 16/11/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
बिगारी
रोज सकाळी बांधून भाकर कामावर निघतो सायकलीवर उचलूतो खडी रेती डबर माती शिमीटाची डोक्यावर पाटी उघडं डोकं तापून जातं उन्हातान्हानं सडकून निघतं रचतो मालात विटेवर विट भिंतीत चिणतो मलाच निट बांधले बांबू वासे लाकडी फळ्या जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या कांक्रीट मिक्सर गोल फिरतं मातीधुळीतच आयुष्य जायचं बाकीचे एखादंच घर बांधतात गरीब बिगारी घरं बांधतो - पाषाणभेद

जिन्याची विहीर (फोटोसकट)

लेखक जागु यांनी बुधवार, 09/11/2011 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर. बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब.

हातपंप

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 07/11/2011 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ|| घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| खालीवर दांडा करावा बरं थोडं कष्टांचं काम हाय सारं पानी येतंयं हापसून न्यारं बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्‍हाती ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२|| सार्‍या बायांनी याची चव घेतली एकजात सार्‍यांनी पसंती दिली हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया मला हा