Skip to main content

जीवनमान

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग १

लेखक Atul Thakur यांनी शनिवार, 25/01/2014 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः| न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत.

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 24/01/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य करणारे करतात निषेध… पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो … शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ? शेवटी मृत्यूच तो …. नाही का ? मग आपण सजवतो त्यांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या तिरंग्यात …. आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत जोडतो आपले हात … आदरा खातर … मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो? आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू … यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ? ऐका माझं ,आपण असंच करु.… तिरंग्यात गुंडाळून आणु ….

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांस पत्र

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 23/01/2014 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रति, प्रादेशिक परिवहन अधिकारी विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार a माननीय महोदय, सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

बंबईसे आया मेरा दोस्त

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 21/01/2014 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 14/01/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात.

एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 12/01/2014 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.