Skip to main content

जीवनमान

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी बुधवार, 24/12/2025 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 10/10/2025 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

एचडीएफसी बॅंक-सावधान!

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 08/10/2025 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
एचडीएफसी बॅंक-सावधान! ================= लोक हो, एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्‍या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे. मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे.

पार्करचे पेन

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 01/10/2025 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
 पार्करचे पेन ====== -राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४) मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती. भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.

जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 29/09/2025 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.

ये दिल मांगे मोर!

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 28/09/2025 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात.

सारे काही एकाच जातीसाठी

लेखक स्वधर्म यांनी रविवार, 14/09/2025 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.

हिंदुत्ववादी आणि उजवे

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/09/2025 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

कल्पका:

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 08/09/2025 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:। अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥ --राजीव उपाध्ये
काव्यरस

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/09/2025 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.