Skip to main content

पाभे की बात क्र. १३

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/10/2026 12:48 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात क्र. १३

देशवासीयों मितरों,

आज पाभे की बात चा नवा एपिसोड. किती दिवस झाले, तरीही ही बात चालूच आहे.

मितरों, 

पाभे की बात म्हणजे काय? एकीकडचा संवाद आहे. प्रश्न उरलेलेच नाहीत, तर उत्तर कसले? फक्त “माझ्या प्रिय देशवासीयांनो…” आणि मग प्रेरणादायी तुमच्या कथा.
आज काय सांगितलं?

पंजाबात सेंद्रिय कापूस, उत्तराखंडमध्ये नदी वाचवली,

मखाना ग्रीसला गेला, तूरडाळ मालदीवला गेली, ई-संजीवनीने ५० कोटी कन्सल्टेशन केले,आयआयटीत मेंदूचे ३डी फोटो काढले आणि फायबर ऑप्टिक्सचे बाबा नारिंदर सिंह कपानी यांची जयंती.
खूप छान.
पण मितरों, एक गोष्ट लक्षात आली?
मणिपूरबद्दल एक शब्दही नाही.
निवडणूक आयोगाच्या यादीत १३ कोटी नावं गायब झाली, त्याबद्दल मौन.
विद्यार्थी रस्त्यावर आहेत, कॉक्रोच जनता पार्टी जंतर-मंतरवर आहे, त्याबद्दल मौन.
पाऊस कमी झाला, दुष्काळ आहे, येत्या काही वर्षांची तजवीज करायची की २०४७ ची तयारी करायची?
न्यायालये वादग्रस्त आहेत, त्याबद्दल मौन. पत्रकार परिषद तर सोडाच, प्रश्न विचारायलाही जागा नाही.
जंगलतोडीला कोण विचारतो? कुणीच नाही.

सगळं कसं गोड गोड.

मितरों, पाभे की बात म्हणजे असेच असते. जे चांगले आहे ते मनात येते, जे अडचणीचे आहे ते मनाच्या बाहेरच राहते.

“साहेब, नदी वाचवली, कापूस वाचवला, पण मतदार यादी वाचवली नाही, दुष्काळ वाचवला नाही?”
उत्तर आहे – “तो विषय पाभे की बातेत येत नाही.”
मितरों, आता तर स्पष्ट झालं आहे.
पाभे की बात = तुमच्या कथा + शांतता + मौन.
प्रश्न = नंतर.
उत्तर = कधीतरी.
पत्रकार परिषद = स्वप्न.
मितरों, एक सल्ला आहे, जर पुढच्या पाभे की बातेत मणिपूर, निवडणूक आयोग आणि विद्यार्थी आंदोलन आलं, तर समजा की नक्की काहीतरी मोठं घडलं आहे. नाहीतर पुन्हा सेंद्रिय कापूस, मखाना आणि मेंदूचे फोटोच येतील.

मितरों, शेवटी एकच गोष्ट समजली की देशात गोंधळ असला तरी मन मात्र शांत ठेवायचं. कारण पाभे की बात चालूच राहणार आहे.
 

भेपुपाकीबा त.

(पुर्वप्रकाशीत)


वाचने 84
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया