मला अनेक गोष्टींचे कौतुक वाटते. त्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे ' दिवे '!
त्या कापसाच्या वातीने, तेलाच्या साथीने, उजळेले दिवे खुप सकारात्मकता देतात.
कोजागिरीला ज्येष्ठय अपत्य ओवाळणी हा फार घरात होणारा रूढी परंपरा आहे. काही घरात मुलगा ज्येष्ठय असेल तरच ओवाळतात. पण आता तसें करत नाही. मुलगा असो वा मुलगी तिला ओवाळतात.
हं... तर असें दिव्यांविषयी जे काही सुचेल, समजेल ते इथे देत राहीन.... दिवाळी पर्यंत!!
उठा उठा दिवाळी आली... लक्ष लक्ष दिव्यांची आरास लावण्याची वेळ झाली....😊
निराञ्जन (निरंजन) : संस्कृत अर्थ
संस्कृतमध्ये निरञ्जनम् आणि नीराजन (नीराजनम्) हे शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरले जातात.
1. निरञ्जन (निर् + अञ्जन) : अंजनरहित, निर्मळ, निष्कलंक, मलिनतारहित. आध्यात्मिक अर्थाने परमात्मा किंवा शुद्ध चैतन्य यांसाठीही निरञ्जन हा शब्द वापरला जातो.
2. नीराजन (नीराजनम्) दीप किंवा ज्योत दाखवून देवतेची आरती करणे, ओवाळणे. पूजाविधीमध्ये हा अर्थ विशेष महत्त्वाचा आहे.
मातुः स्नेहनीराजनम् -आईचे निरंजन
आकाशाच्या घरात कोजागिराचा चंद्राचा आला,
नभात उतरला शुभप्रकाश, मंगल सोहळा सजला।
आईने घेतले निरांजन हाती,
वाती सजविल्या तिळाच्या तेलात भक्तिभावाने न्हाती।
बाळाला ओवाळिले हळुवार हातांनी, मायेचे दीप उजळले प्रेमळ नजरेने।
आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे ते बाळ,
डोळ्यांत स्वप्ने, चेहऱ्यावर कौतुकाची लाली।
निरांजनाभोवती हात फिरत राहिले, चंदनाचे सुगंधी दरवळ हवेत मिसळत गेले।
तेजाचे मोहक किरण पसरले चारही दिशांनी, घर भरून गेले आशीर्वादांच्या प्रकाशकिरणांनी।
कितीही दिवे इकडे-तिकडे लागलेले असले,
आईच्या निरांजनाने प्रेमाचे नाते उजळले।
ते नाते आशीर्वादांनी सदैव फुलत राहिले, बाळाच्या आयुष्यावर मंगल सावट धरून राहिले।
-भक्ती
तसेच निरांजन म्हटलं की आठवतात माणिकताई...
"लाविते मी निरांजन" हे सुप्रसिद्ध मराठी भावगीत, ज्येष्ठ शास्त्रीय व सुगम संगीत गायिका माणिक वर्मा यांनी गायले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मुलीला येणारी माहेरची अन् आईची आठवण या गाण्यात अत्यंत भावूक शब्दांत मांडली आहे.
लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी
आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या आंघोळी
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली
घरोघरी दीपज्योती वर्षाचा मोठा सण
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण
चार वर्षांमागे होता हात तुझा अंगावरी
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी
आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा
तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते
लाविते मी निरांजन
सासरीच्या या संसारी माहेराची आठवण
आठवती बाबा भाऊ आणि दारीचं अंगण
अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी
लाविते मी निरांजन
आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन
जिथे उभे अंगणांत तुळशीचे वृंदावन
दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा
कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा
लाविते मी निरांजन...
मिसळपाव
प्रतिक्रिया