"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...."
"बोल."
"महामहीम, वनातून संदेश आला आहे."
काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले.
"पंडुंचे देहावसान झाले."
"पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली.
'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा......