मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

तमिळनाडूचा इतिहास भाग - ७

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता. पण बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांच्या आनंदमठ(१८८२) नंतर राष्ट्रवादी वातावरण तयार होऊ लागले.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ६

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता.

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली. मी विचारलं- “आणी ब्राह्मण?” तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.

महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्‍मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून. मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्‍याचदा प्राणि पुरणे.

तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला. आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे.

तमिळनाडूचा ईतिहास भाग-३

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती. कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.

तमिळनाडूचा ईतिहास भाग - २

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय. आॅगस्ट १६३९ च्या एका दुपारी दोन ईंग्रज अधिकारी पुलीकट च्या दक्षीणेला समुद्राकाठच्या एका ओसाड जमीनीचे निरीक्षण करत होते. “काय वाटतं?” आपल्या कारखान्याला हा जागा ठीक राहील?” फ्रांसील डे बोलला. “आता विचारतोय?

तमिळनाडूचा ईतिहास भाग - १

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
उत्तर भारतीय अनेक कारणांनी तमिळनाडूत जातात. तीर्थयात्रेला, चेन्नईतील एखाद्या संगणक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. कोणत्याही सरकारी पदावर. शिवकाशीच्या फटाका उद्योगात नोकरीला, कोईम्बतूर येथील गुजराती आणि मारवाड्यांच्या कारखान्यात. सालेमच्या कारखान्यात. तिरुपूरमध्ये मी बिहारच्या एका माणसाला विचारलं, “तू इथे कसा आलास?”, गावातील एका भावाने त्याला नोकरी लावल्याचे त्यांनी सांगितले. मी विचारले, "तुला इंग्रजी येते का? तो म्हणाला, “इंग्रजी अवघड आहे. त्यामुळे मी तमिळ शिकलो.” 'ब्लू कॉलर जॉब' मध्ये गुंतलेली एक कमी शिकलेली व्यक्ती तमिळ शिकली.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

भारत माझा देश आहे

अनुस्वार ·
तुमच्या घरात कुणी तिसराच राहायला येऊन "आता हे घर माझं आणि तुम्ही नोकर", असं म्हणाला तर तुम्ही काय कराल? काही आक्रमण करणाऱ्यावर हल्ला करतील, काही वाटाघाटी करतील आणि काही मलाही तसं सगळं सांभाळायला अवघड जात होतं असा विचार करून चक्क त्या त्रयस्थ माणसाची गुलामी स्वीकारतील. थोडं वरच्या पातळीवर जाऊ. त्या शेवटच्या माणसासारखा गावचा सरपंच वागला तर गावचा कारभार तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात जाणार. आजपासून सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी, इसवी सन १६०० साली असंच काहीसं घडलं.