Skip to main content

धर्म

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

उद ग अम्बे उद ! उद !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 14/10/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.

चर्पटपंजरिका स्तोत्राचा भावानुवाद

लेखक राघव यांनी गुरुवार, 14/10/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः आदी शंकराचार्यविरचित चर्पटपंजरिका स्तोत्र खाली लिहिलेले आहे. जालावर बर्‍याच ठिकाणी पाठभेद दिसलेत. शेवटी माझ्याजवळील पुस्तकात होते त्याप्रमाणे लिहिलेले आहे. चु.भु.द्या.घ्या. द्वादशपंजरिका व चर्पटपंजरिका अशी दोन स्तोत्रं आहेत. मी केवळ चर्पटपंजरिका स्तोत्राचाच भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. हा भावानुवाद आहे, त्यामुळे मूळ गाभा कायम ठेवून अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.
काव्यरस