िशख ध्रम की पंथ

लेखनविषय:
िशख ध्रम की पंथ? कारण िशख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी िहंदु देवतांची पुजा करतात . िमपाकर जरा या बदंदल कोणी प्रकाश टाकेल का?

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखनविषय:
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

लेखनविषय:
लेखनप्रकार
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा.

धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा

लेखनप्रकार
ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्‍या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

नास्तीकांचे भारतातील योगदान

लेखनविषय:
संकुचीत विचार बाजूला ठेऊन उदात्त विचार करण्याची क्षमता असेल तर नास्तिकांनाही हिंदू जिवनपद्धतीचा अवलंब करता यावा. धर्मसंस्था थेअरी मध्ये उदात्त दिसतात पण दुर्दैवाने अनेकदा व्यवहारात संकुचितवृत्तीच्या धर्ममतावलंबीकडून धर्मसंस्थांना आक्रसून टाकले जाताना दिसते अगदी तसेच विवीध समाजघटकांनी हिंदू संस्कृतीत योगदान देऊनही त्यांना अव्हेरणे, नकारात्मक आणि अथवा विषम वागणूक देणे हे हिंदूंमध्येही दिसते यात नास्तीकांचेही योगदान नाकारले जाताना दिसते.

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखनविषय:
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

लेखनविषय:
लेखनप्रकार

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

जय जय रघुवीर समर्थ ! प्रस्तावना : ( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६) सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!

महेश कोठारे कि एकता कपूर??

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्ते, मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश कोठारे.अभिनेता+निर्माता+दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर कार्यरत राहून स्वतःच मोठं अस्तित्व निर्माण केलय. त्यांचे ते पाचअक्षरी धमाल चित्रपट अजूनही पहावेसे वाटतात. पण हल्ली त्यांना नेमकं काय झालय तेच कळेना! झी मराठीवर जय मल्हार ही त्यांचीच देण.त्यामध्ये कथानकाची पार वाट लावून टाकली आहे,आणि नारदाचं आख्यान महिना झालं तरी संपेना.इतकच नव्हे तर त्यांना अजून एक अचाट कल्पना सुचली,कलर्स मराठीवर "गणपती बाप्पा मोरया" म्हणून गणपतीची सिरियल चालू केली आहे,त्यामध्येसुद्धा कथानकाची पार वाट लावून टाकली आहे.हेवेदावे काय?टोमणे काय?वाद काय?

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...
Subscribe to धर्म