Skip to main content

देशांतर

अक्साई चीन्

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/10/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.

एडीएफ, व्हीओआर, आयएलएस...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 30/09/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
विमान उडवताना दिशा कशी शोधायची आणि न्येमकं जिथे पोचायचं तिथे पोचायचं कसं? याचं उत्तर म्हणून एअर नॅव्हिगेशन हा विषय काढण्यात आलाय. मी माझ्या बायकोच्या दिग्दर्शनाशिवाय मंडईपासून घरी येऊ शकत नाही असं माझं दिशाज्ञान आहे. तेव्हा आकाशातल्या पोकळीत दिशा ओळखण्याविषयी काय अवस्था असेल ते सांगायलाच नको. हा विषय मी शिकायला लागलो तेव्हा जाम भंजाळलो होतो. सगळं डोक्यावरुन जात होतं. डोळ्यासमोर अनेक तबकड्या आणि त्यांचे काटे गरागरा फिरायचे.

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...

लेखक गवि यांनी सोमवार, 26/09/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
: विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात. पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं. समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल.

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/08/2011 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे). पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : एक दृष्टिक्षेप

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 30/07/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा.... आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते.