Skip to main content

देशांतर

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

अलखपैंजणी परखडमोती

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 27/03/2012 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

द स्पिरिट ...

लेखक गवि यांनी बुधवार, 14/03/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचा भाग: झुईं.. राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं... नव्या तंत्राचा पहिला उपयोग आपण माणसं ज्यासाठी करतो त्यासाठी, अर्थात युद्धासाठी, विमानाचा वापर शोध लागताक्षणीच सुरु झाला.

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..

बोंबाबोंब...

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 02/03/2012 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20863 हा धागा.. खरं तर ह्यावर प्रतिक्रीया देवून थांबणार होतो, पण "अंगापेक्षा बोंगा जड" होईल म्हणून म्हटलं वेगळा धागाच काढूया.. (त्यातल्या रणजितजींच्या प्रतिसादावरुन शिर्षक सुचलंय. "अभ्यासु" टायपातलं आणि विषयाशी फारसं निगडीत नाही, त्यासाठी सॉरी बॉस.. ;-)) ************************************************************** माझ्या मेघालयावरच्या लेखावर प्रतिक्रीया देणार्‍या काही जणांनी इथल्या जेवण-खाणाबद्दल विचारलं होतं. आसामप्रमाणेच इथेही मुख्य खाद्य म्हणजे भात.. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे नसतात.

क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १

लेखक टुकुल यांनी सोमवार, 16/01/2012 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात. एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली.

सी- सॅट..!!

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 16/11/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये "सी- सॅट" आणि "डी- सॅट" हे नेहमीच्या वापरातले शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर, "डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )" आणि "सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)" प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते. जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं.