मुंबईकराला स्ट्रॉबेरी दिसते ती आकर्षक खोक्यात. आणि विकत घेतल्यावर समजते की स्ट्रॉबेर्या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाईतक्याच आहेत, बाकी खोक्याचा खालचा भाग भरलाय कागदी कपट्यांनी.
पाचगणीच्या मॅप्रो उद्यानातुन पाचगणी गावाकडे येताना एका झाडाखाली एक स्ट्रॉबेरीचा ठेला दिसला. गाडी थांबवली. ठेलेवाल्या मामांनी प्रेमानी सार्यांना स्ट्रॉबेर्या हातावर दिल्या. रसाळ होत्या खर्या. मामा हुशार. पोराटोरांना पाहताच म्हणाले, भाव कशाला करता घ्या आपल्या हातान खुडुन, भरा टोपली मग भावाच बघु! मामा जवळच्याच भोसे गावातले. स्वतःचा छोटा मळा होता, सध्या चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे म्हणाले.