Skip to main content

छायाचित्रण

धुकं.. फोटोज!

लेखक राघव यांनी रविवार, 02/11/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते.

प्रकाशचित्रे : सुख वाटे जीवा...

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 30/10/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच! पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे. डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो. कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो. निसर्गाशी गळाभेट होते.

कबिनीकाठचे हती

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 28/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथुन कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी!

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

भाजे लेणी

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 23/10/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

रोज गार्डन - चंदिगड

लेखक मिंटी यांनी सोमवार, 13/10/2008 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त.. चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन...

आकाशातून पृथ्वी

लेखक चित्रा यांनी बुधवार, 08/10/2008 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार नक्की कुठचा निवडायचा कळला नाही. पण आत्ताच काही छायाचित्रे पाहिली. Yann Arthus-Bertrand या छायाचित्रकाराने पॄथ्वीची आकाशात उंचावरून घेतलेली छायाचित्रे न्यूयॉर्क येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. ह्या चित्रांचा आकार ४ x ६ फूट एवढा असणार आहे. ती इतर काही पाहिलेल्या आकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या चित्रांपेक्षा काहीशी वेगळी आणि सुंदर वाटली म्हणून मिपाकरांसाठी इथे देते. मूळ दुव्यावर जाऊन पहावीत.