आज पुन्हा मरणास पाहिले
मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.
असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे.
मिसळपाव
लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणा सांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ.