Skip to main content

चित्रपट

शोलेची आग

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्या चित्रपटांविषयी - आवडत्या, नावडत्या, कमी प्रसिध्द, टुकार, भंगार आणि अजून काय काय, बराच काथ्याकूट चालू आहे. त्या चित्रपटांच्या यादीत एक ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस! शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते.

लघुपट महोत्सव

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 15/04/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
लघुपट महोत्सव पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऒफ इंडिया तथा एफ टी आय आय ही एक नावाजलेली संस्था आहे. तिथे १० व ११ एप्रिल २०१० ला मानवी विकास या विषयावरील विविध प्रादेशिक लघुपट दाखवण्यात आले.निमित्त होते ते संस्थेच्या गोल्डन ज्युबिली वर्षाचे. दोन दिवसात त्यांनी २६ लघुपट दाखवले. हे लघुपट संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. या महोत्सवाच्या उपक्रमाचे समन्वयक होते मिलिंद दामले. अशा ठिकाणी मराठी नाव असल कि जरा बरच वाटत.लघुपटातुन मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवे्ळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवलेली गेली.

मला आवडलेले काही (कमी किंवा अ प्रसिद्ध) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 15/04/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 14/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले. त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं......

बाप आणि मुलगी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 13/04/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहायला मिळालेली एक सुरेख अ‍ॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी! ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!

चित्रपट पाहणे: घरी, चित्रपटगृहात आणि आता पुन्हा घरातच

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 05/04/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

लागा चुनरीमे दाग..

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 29/03/2010 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडी सिनेमे पाहण्याचं फ्याड आता इथे चांगलंच रुजलं आहे. हिंदी शिनूमांच्या जर्मन डब्ड डीव्हीडी.. नव्हे डेफाउडे, हो जर्मन मध्ये डेफाउडेच! तर ह्या तबकड्या आता दुकानादुकानांतून दिसायला लागूनही जुन्या झाल्या. पण ह्यातलीच एखादी बया आपल्या घरात भेट द्यायला येईल असं मात्र कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण.. आमच्या एका फिरंगी मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला( बायको आणि दोन मुले वयं अनुक्रमे १४ आणि १८) राणीबाई फारच आवडायला लागल्या आणि 'लागा चुनरीमे दाग' नावाच्या सिनेमाची तबकडी आम्हाला चक्क भेट म्हणून दिली की त्यांनी.. आतापर्यंत लागा चुनरीमे दाग..

जलते है जिसके लिए

लेखक अरुंधती यांनी रविवार, 28/03/2010 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं हसणं, तिच्या चेहर्‍यावर उमटणार्‍या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं. नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्‍या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला.

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'. 'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो. नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो.