Skip to main content

चित्रपट

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
काव्यरस

ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 31/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला. येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.

आफ्रिकन सफारी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 29/05/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
लेख एकटाकी लिहिला आहे. टंकनदोष असल्यास क्षमस्व. खरडीतून कळवल्यास दुरुस्त केले जातील आफ्रिका म्हटलं की डोळ्यापुढे उभे रहातात ती घनदाट जंगले, प्राणीसृष्टी, काळ्या रंगाचे रहिवासी, साऊथ आफ्रिकेची टिम, इजिप्तचे पिरॅमिड आणि सोमालियासारखे दारिद्र्य... मात्र आफ्रिका इथेच संपते का? तर छे! ती तर इथे सूरु होते. कधीतरी ह्या खंडात भटकायची इच्छा जुनी आहे. मात्र दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने आफ्रिका खंडातील विषयांवरचे चित्रपट बघायचे ठरवले. ६ चित्रपट डाऊनलोड केले त्यात एक डॉक्युमेंटरी आणि ५ चित्रपट होते. त्यातल्या चार चित्रपटांची ओळख करण्यासाठी हा लेख.

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो: गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग पदर कमरेला विळखा घाली असती आपल्यातच दंग चाल तुझी मोरावानी हरणापरी चपळ अंग कुठं जाशी कुठून येशी सांग सांग सांग पोरी सांग सांग सांग
ती: गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद शिंप्याची चुक झाली केली चोळी त्याने तंग मोर हरणावानी चाल चपळ न्हाई तुझ्यागत फोपशी अंग नसत्या चौकशा करू
काव्यरस

"....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 26/05/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका धाग्याच्या संदर्भात नुकतेच दोन ज्येष्ठ सदस्य "मधुबाला" विषयावर चर्चा करत होते ते मी वाचले आणि एका योगायोगाची आठवण झाली. मी आज असे म्हणायचे कारण म्हणजे नवी दिल्ली इथून माझ्या एका मित्राने या स्वप्न सुंदरीचा ई-मेल ने पाठविलेला फोटो. तसे आंतरजालावर मधुबालाचे शेकड्यांने फोटो उपलब्ध आहेत, पण त्याला अचानकच तेथील एका व्यक्तीच्या खाजगी संग्रहात हा फोटो मिळाला.

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/05/2010 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या) सिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत. चालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन. (खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. ) गाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. (लग्नपत्रिकेत नाही का लिहीत की आहेर आणू नये. जेवणाचा आस्वाद घ्यावा तसे.
काव्यरस

चित्रमानपत्र (भाग १)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/05/2010 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जसे आपले वर्तमानपत्र रोजच्या "खर्‍या" घडलेल्या घटना आपल्यापर्यंत पोचवते, तसेच .... प्रस्तुत आहे- चित्रपानपत्र.. म्हणजे काय? असे विचारता? सांगतो.

विजय तेंडुलकरांचा !

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 19/05/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

गणपती बाप्पा मोरया

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 19/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.
काव्यरस

आज पुन्हा मरणास पाहिले

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 16/05/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे. असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे.