Skip to main content

चित्रपट

देवदासच्या निमित्ताने....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 28/07/2016 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजच आंतरजालावर नेहमीप्रमाणे काहीबाही शोधत असताना समोर बातमी दिसली.... मराठीतल्या देवदासचा पहिला टिझर लाँच.. नेहमीप्रमाणे उत्सुकता चाळवली गेली अन मी त्या लिंकवर क्लिक केलं... 'तुझं लग्न हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहुन गेलो कि नवर्‍याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाउलवाटही सापडत नाही ग.त्या अश्रुंची विहीर कधी तुला पाहायला मिळाली असती तर माझ्या दु:खांचा अंदाज तुला लावता आला असता.....मी काय करेन माहिती आहे, मी नक्कि न रडताच श्वास सोडेन.

बावरे प्रेम हे - एक दिव्यपट

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 26/07/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं.

कबाली

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 23/07/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही. साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते.

सुलतान नव्हे ,तर सुलताना

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 21/07/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली अनुष्का शर्मा एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी त्याला काहीतरी बन असे शिकवणारी स्वतःच्या carrer चा त्याग करणारी गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून तिला लाख लाख सलाम

रमन राघव २.०

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 15/07/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्‍याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात. समोर दिसणार तेवढच खर अस बर्‍याच वेळा नसतं.

एंडी हार्डीची मालिका म्हणजेच मिकी रूनीची धमाल

लेखक महामाया यांनी मंगळवार, 12/07/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला. ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं- ‘एंड दि ऑस्कर गोज टू...’ तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’ छोटया पडद्यावर कर्क डगलसचा ‘स्पार्टाकस’ बघितला होता.

सुलतान

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 10/07/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय??

जुनुनियत....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 08/07/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे कथाकथनाचं पण कथा मांडताना माध्यमाचा वापर योग्य पद्धतीनं झाला नाही तर चित्रपट फसतो. फक्त गोरे-गोरे, सुंदर चेहर्‍याचे कलाकार घेतले, कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रिकरण केलं आणि तिच घासुन घासुन चोथा झालेली कथा 'it's different' म्हणुन सादर केली कि चित्रपट होतो हा गैरसमज आहे. हा समज द्रुढ करणारा अजुन एक चित्रपट म्हणजे 'जुनुनियत....' कर्नल जोहान बक्षी- सुहानी कपूर या दोघांची ही कथा. टिपिकल प्रेमकथा पठडीतली..त्यामुळे अधिक लिहिणं गरजेच नाही. कथा ठिकठाक असली तरी पटकथा अत्यंत सुमार दर्जाची.

इराणी चित्रपट - 'द ब्राईट डे'

लेखक विशाखा पाटील यांनी बुधवार, 06/07/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
इराणी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म साधारण एकाच काळातला. आपल्याकडे जेव्हा दादासाहेब फाळकेंना कॅमेराच्या वेडाने झपाटलं होतं, त्याच सुमारास इराणमध्येही राजदरबारातली मंडळी युरोपातून कॅमेरा आणून चित्रफिती तयार करण्याच्या कामाला लागली होती. त्या काळी तिथे फार चित्रपट तयार होत नसले तरी हळूहळू हे क्षेत्र बहरू लागलं. तेवढ्यात १९७९ मध्ये इराणमध्ये राजकीय भूकंप झाला. इस्लामी राज्यक्रांती झाल्यावर कलाकार हादरले, देश सोडून पळाले. अशा राजवटीत चित्रपटावर कुऱ्हाड कोसळणार हे उघडच होतं. पण इराणच्या राजवटीने थोडासा का होईना आश्चर्याचा धक्का दिला.

ग्रीर गारसन-तिने ग्रेगरी पैक सोबत लग्नाला नकार दिला होता

लेखक महामाया यांनी मंगळवार, 05/07/2016 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अाठवणीतला हॉलीवुड/ पाच-ग्रीर गारसनची स्पष्टवादिता मिस्ट्रेस म्हणून नायिका कामावर रूजू होते, आपल्या स्वभावाने ती घरच्या मंडळींचं मन जिंकून घेते. नायकाचं तिच्यावर प्रेम जडतं व ‘ती’ चक्क त्या घराची गृह स्वामिनी होते. सुखान्त असलेल्या या विषयावर बरेच हिंदी चित्रपट आले, येताहेत.