Skip to main content

चित्रपट

अगरीयांच्या शोधात

लेखक अमृता गंगातीरकर यांनी बुधवार, 14/06/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता.

" सचिन सचिन "

लेखक amit१२३ यांनी बुधवार, 31/05/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन ए बिलियन ड्रीम्स ..हा फक्त सचिन चा चित्रपट नाही तर सचिन आणि क्रिकेट सोबत आपण जे क्षण घालवले त्याची उजळणी आहे. क्रिकेट समजण्याआधी सचिन समजला होता, त्यामुळेच की काय सचिन बद्दल जरा जास्तच आकर्षण होते. आपल्या देशातील करोडो लोकांमध्ये २५ लाख लोकांचे नाव तरी सचिन असण्याला हाच कारणीभूत असावा असे मला वाटते. त्याने घातलेल्या जर्सीवरील १० नंबर पण इतका आकर्षित करायचा की मी खो खो खेळताना पण माझ्या जर्सीवर १० नंबर हवा असा आग्रह धरायचो. शाळेत असताना मॅच सुरु आहे म्हटल्यावर सुट्टीमध्ये शेजारील घरी जाऊन सचिन कितीवर खेळतोय याची पहिली चौकशी करायचो.

कटप्पाने ...... जानरावची परेसानी

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 10/05/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो.

बाहुबली २ - The Conclusion

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 29/04/2017 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल.

मूर्खांची लक्षणे !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 14/04/2017 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही...हुरळून जाऊ नका..हे माझं आत्मचरित्र नव्हे.आतमध्ये काहीही लिहिलं तरी नावं त्याला साजेसं देऊ नये इतपत समज आलीये एव्हाना.आता आत्मचरित्र नसलं तरी ही लक्षणं माझी आणि माझ्यासारख्याच इतर अनेकांची आहेत हे लक्षात येईलच! रविवारचा दिवस! म्हणजे झी सिनेमा आणि सेट मॅक्सवर अनुक्रमे हम आपके है कौन आणि सूर्यवंशम पाहण्याचा दिवस! त्यातल्या त्यात सूर्यवंशम हा कुठल्याही समीक्षेच्या पलीकडे पोहोचलेला सिनेमा आहे.

एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 09/04/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है, नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!! श्रेयनिर्देशः दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल.

माण णा माण, मी पायला सुलताण!

लेखक तिमा यांनी शनिवार, 25/03/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंगः- वोल्वोचा प्रवास वेळः अर्थातच कुवेळ घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे तर, मी आप‌ला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता.

लाल टांगेवाला

लेखक रासपुतीन यांनी बुधवार, 22/03/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

इजाजत!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला गुलजारचे चित्रपट आवडतात बुवा. आता त्याचे सगळेच चित्रपट आवडतात, अशातला भाग नाही पण साधारण १९९५ च्या आधीचे म्हणजे माचिसच्या आधीचे चित्रपट मला आवडतात. इतर दिग्दर्शक आणि गुलझार यांच्या बाबत असं जाणवत कि इतर दिग्दर्शकांचे चित्रपट आवडले तरी त्याचित्रपटातले सगळे आवडतेच असे नाही. म्हणजे कदाचित गाणी आवडणार नाहीत किंवा climax आवडणार नाही पण गुलझार चा चित्रपट मलातरी एकतर सगळा च्या सगळा अवडतो किंवा अजिबात आवडत नाही उदा. हुतुतू हा मला अजिबात आवडला नाही अगदी गाण्यांसकट.

Naked नक्की पाहायला हवी अशी शॉर्ट फिल्म !

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/03/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यातला विषय काही नवा नाही. निष्कर्ष तर अजिबातच नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे... कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या "बोल राधा बोल" पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी(भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी?.....) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहेतच कि ...तेहा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही .... नक्की बघा , लिंक दिलेली आहे https://www.youtube.com/watch?v=R29hoYjAF6w