Skip to main content

चित्रपट

नटसम्राट आणि कथासम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 22/05/2016 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नटसम्राट हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कालच बघितला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आणि तितकेच महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम! मी नटसम्राट नाटक बघितलेले नाही आणि नाटक वाचलेले सुद्धा नाही. म्हणून मनात कसलीही तुलना न करता हा चित्रपट मी बघू शकलो. अशा प्रकारच्या कथा असलेले इतर अनेक मराठी हिंदी चित्रपट येऊन गेले. (उदा. राजेश खन्नाचा अवतार, सुलोचना चा मराठी चित्रपट एकटी, अमिताभचा बागबान, माझं घर माझा संसार, लेक चालली सासरला, माहेरची साडी वगैरे) पण "नटसम्राट" हा अनेक बाबतीत मला "वेगळा" वाटला. यात कुणा एकाचीच बाजू बरोबर आणि एकाची चूकच असा पूर्वग्रहदूषित विचार लेखकाने केलेला नाही.

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या मंतरलेल्या रात्री होत्या... काय सांगता राव...! हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या. कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे.

सैराट - अफाट स्टोरी टेलींग

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 14/05/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा! प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून.

सैराट - काव्यांजली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 11/05/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

"शतकोटी" सैराट

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 09/05/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्र सैराटच्या गल्ल्याबद्दल चर्चा करत होते. एकाचं मत पडलं की सैराट १०० कोट कमावणारच!(ग्रॉस) दुसरा म्हणाला की १०० नाही, पण ५० कमावेल आणि मराठी चित्रपटांचा आवाका आणि अडचणी बघता ५० म्हणजेच ५०० कोटी! पण एकंदर सगळ्यांच्या मते लवकरच मराठी सिनेमा शतकोटी उड्डाणे भरू लागेल ह्यावर सार्‍यांचे एकमत होते. माझ्याही मते हे अशक्य नाहीच, पण त्याआधी बरेच बदल घडावे/घडवावे लागतील.

सैराट

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 09/05/2016 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच.

सैराट - याड लागलं!

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 09/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत! काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते.

सैराटच्या निमित्ताने....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 08/05/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४.

"काय झालं प्रिन्सदादा?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 08/05/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत. त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं. आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली. टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली.

सैराट...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शनिवार, 07/05/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा आमचा सगळ्यात आवडता उद्योग त्यामुळे असे फार कमी चित्रपट असतात जे आमच्या तावडीतुन सुटतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तो पाहिला नाही असं फार कमी होतं. दुर्दैवांन हा योग सैराटच्या बाबतिही जुळुन आला. सैराट्बद्दल बर्‍याच जनांकडुन ऐकत होतो. वाचत होतो. 'सैराट' नाव फारच कॅची होतं त्यामुळे उत्सुकता होतीच पण अजुन एक कारण होतं ते म्हणजे नागराज मंजुळे. फँड्री पाहील्यानंतर या माणसाकडुन अपेक्षा वाढल्या.पहिल्याच बॉलवर सेहवागने जर छक्का मारला तर आपोआपच त्याच्या पुढच्या खेळीविषयी एक वेगळीच अपेक्षा निर्माण होते तसचं काहीसं नागराजच्या बाबतित झालं.