अर्थ- शबानाचा... आणि रोहिणीचाही !
आमच्या वडलांना जुने मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा षौक फार. त्याकाळात त्यांनी खास त्यासाठी घरी VCR घेतला होता जेव्हा tv च काय फोनसुद्धा अक्ख्या चाळीत मिळून १-२ घरात असे व तो सार्वजानिक मालकीचा मानला जात असे. ते स्वतः निरनिराळे जुने सिनेमे आणून बघत आणि मलाही दाखवत, त्यांच्यामुळे मला खूप चांगले चांगले सिनेमे बघायला मिळाले .
एकदा त्यांनी असाच " अर्थ" हा महेश भट्ट चा सिनेमा आणला ८ वी मध्ये असेन मी त्यावेळी. सिनेमा बरा वाटला. बाबा म्हणाले,काय कळलं हा सिनेमा पाहुन.
मिसळपाव
